Gold Rate : वृत्तसंस्था : सोन्या-चांदीच्या दरांमध्ये वारंवार चढउतार होत असतात. अलीकडेच सोन्या आणि चांदीच्या किमती घसरत असल्याने सोने-चांदीच्या खरेदीदारांना काहीसा दिलासा मिळाला आहे. सध्या आंतरराष्ट्रीय पातळीवर सोने व चांदीच्या मागणीत घट झाली आहे. परिणामी, सराफा बाजारांमध्ये सोन्याच्या भावात घसरण झाली आहे. आज सराफा बाजारात सोन्या-चांदीची किंमत खाली घसरली आहे. सोन्याचे दर 58 हजार 500 रुपये प्रतितोळा, तर चांदीचे दर 70 हजार रुपयांवर स्थिरावले आहेत.
मागील दोन महिन्यांतील नीचांक भाव
आठ दिवसांत सोन्याच्या भावात तोळ्यामागे 2 हजार रुपये, तर चांदी किलोमागे 2 हजार रुपयांनी उतरली आहे. जून महिन्याच्या सुरुवाती पासूनच सोन्या-चांदीच्या दरात घसरण होत आहे. (Gold Rate) सध्या सोन्या-चांदीला मिळत असलेले दर हे मागील 2 महिन्यांतील नीचांकी आहेत. कोणत्याही वस्तूची किंमत ‘मागणी व पुरवठा’ या अर्थशास्त्रीय नियमानुसार ठरते. मागणी वाढल्यास किंमत वधारते व मागणी घटल्यास किंमत आपोआप घसरते.हाच नियम सुवर्ण-चांदी साठीही लागू होतो. त्यामुळे सोन्या-चांदीच्या दरांमध्ये वारंवार चढउतार होत असतात.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Gold Rate Dropped : सोन्याच्या दरात आज पुन्हा घसरण, जाणून घ्या आजचा दर
Paranda News : तांदुळवाडी ते देऊळगांव रस्त्यावरील पुलाचे काम करण्याची मनसेची मागणी
Paranda News : गड संवर्धन उपक्रमांतर्गत परंडा भुईकोट किल्ल्यावर स्वच्छता मोहिम सुरु