Gold Rate: सध्या सोन्याच्या किमती गगनाला भिडत आहेत. दरम्यान, आज सोन्याच्या किमतीत घट झाल्याने सामान्य नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला आहे. प्रति १० ग्रॅम २४ कॅरेट सोन्याची किंमत ₹८७,६०० आहे. प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याची किंमत ₹८०,३०० आहे. चांदीचे दर प्रति किलो चांदीची किंमत ₹८९,३५० आहे, तर प्रति १० ग्रॅम चांदीची किंमत ₹८८३ आहे. लग्न सराईची लगबग सुरु असल्याने सोने- चांदीची खरेदी मोठ्या प्रमाणात केली जाते, परंतु किमती 90 च्या पलीकडे गेल्याने अनेकांना सोने, चांदीची खरेदी करणे परवडणारे नव्हते. दरम्यान, थोड्या प्रमाणात का होत नाही. किमतीत घट झाल्याने नागरिकांमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळत आहे.
विविध शहरांमधील सोन्याच्या किमती:
– मुंबई: प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याची किंमत ₹८२,८४० आहे आणि प्रति १० ग्रॅम २४ कॅरेट सोन्याची किंमत ₹९०,३७० आहे.
– पुणे: प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ८२,८४० रुपये आहे आणि प्रति १० ग्रॅम २४ कॅरेट सोन्याचा दर ९०,३७० रुपये आहे.
– नागपूर: प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ८२,८४० रुपये आहे आणि प्रति १० ग्रॅम २४ कॅरेट सोन्याचा दर ९०,३७० रुपये आहे.
– नाशिक: प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ८२,८७० रुपये आहे आणि प्रति १० ग्रॅम २४ कॅरेट सोन्याचा दर ९०,४०० रुपये आहे.
सोन्याच्या दागिन्यांच्या किमती या उत्पादन खर्च, राज्य कर आणि मेकिंग शुल्क यासह अनेक घटकांवर अवलंबून बदलू शकतात. या घटकांमुळे विविध शहरे आणि प्रदेशांमध्ये किंमती वेगवेगळ्या असू शकतात.