भारत: भारतातील सोन्याच्या किमती गगनाला भिडल्या आहेत, दर एक रात्रीत 93,000 मध्ये 700 ने वाढून थेट 93,700 रुपयांवर जाणून पोहोचला आहे. जागतिक बाजारपेठेतील अनिश्चितता आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ धोरणाच्या प्रभावामुळे सोन्याच्या किमती झपाट्याने वाढत आहे. इंडस्ट्री तज्ज्ञांच्या मते, सध्या सुरू असलेली जागतिक अनिश्चितता आणि अमेरिकेच्या टॅरिफ धोरणामुळे जगभरात सोन्याच्या किमतीत वाढ झाली आहे. येत्या काही दिवसांत सोन्याच्या किमती 95,000-₹97,000 पर्यंत पोहोचू शकतील असे मत तज्ञांनी व्यक्त केले आहे. भारतात, विशेषतः लग्नाच्या हंगामात सोन्याची मागणी जास्त असते. मात्र, वाढत्या किमतींमुळे ग्राहकांमध्ये थांबा आणि फक्त पाहा अशी स्थितीनिर्माण झाली आहे. कारण वाढलेल्या किमती सामान्यांना परवडणाऱ्या नाहीत. उच्च किंमती असूनही, सोने अजूनही फायदेशीर गुंतवणूक पर्याय मानले जाते असून सराफा बाजारात सोन्याची मागणी स्थिर आहे.
एका सोने विक्रेत्याने सांगितले कि, “जागतिक बाजारपेठेतील अनिश्चितता आणि यूएस टॅरिफ धोरणामुळे सोन्याच्या किमतीत वाढ झाली आहे. हि वाढ कायम राहण्याची शक्यता आहे. जळगावमध्ये सध्याचा सोन्याचा दर 93,500 प्रति 10 ग्रॅम आहे, तर चांदीचा दर 1,02,000 प्रति किलोग्रॅमवर पोहोचला आहे. आर्थिक अनिश्चिततेच्या काळात सोने हि सुरक्षित मालमत्ता मानली जात असल्याने वाढत्या किमती असूनही सोन्याची मागणी जास्त राहील असा उद्योग तज्ञांचा अंदाज आहे.