नवी दिल्ली : अक्षय्य तृतीयेपूर्वीच सोने आणि चांदीच्या दरात मोठी वाढ झाली आहे. यापूर्वी सोने-चांदीच्या दरात घसरण दिसून येत होती. मात्र, आता या दरात वाढ झाली. ऐन सणासुदीच्या काळात ही दरवाढ झाल्याने ग्राहकांची पुरती निराशा झाली आहे.
अक्षय्य तृतीयेच्या दिवशी मौल्यवान धातू खरेदी शुभ मानली जाते आणि या दिवशी खरेदी केलेले धन कायम राहते अशी मान्यता आहे. असे असताना अक्षय्य तृतीयेच्या आधी सोन्याचे भाव कमी होतील, अशी शक्यताही वर्तवली जात होती. मात्र, अलीकडच्या दरवाढीने ग्राहकांना मात्र जोरदार धक्काच बसला आहे. मागील काही दिवसांपासून सोने आणि चांदीच्या किंमतीत कमी नोंदवली जात होती. मात्र, आता या सोने-चांदीच्या दरात वाढ दिसत आहे.
सध्या पुण्यात 24 कॅरेट प्रतितोळ्याचा दर 71,670 रुपयांवर गेला आहे. तर 22 कॅरेट सोन्याचा दर 66,333 वर आहे. याशिवाय, चांदीच्या दरातही वाढ दिसत आहे. चांदी प्रतिकिलो 83 हजारांवर पोहोचली आहे.