नवी दिल्ली : गेल्या काही दिवसांपासून सोन्या-चांदीच्या दरात मोठ्या प्रमाणात चढ-उतार पाहायला मिळत आहेत. मात्र या आठवड्यात दोन्ही मौल्यवान धातूंच्या किमतींनी जोरदार वाढ नोंदवली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारातील परिस्थिती, डॉलर इंडेक्समधील कमजोरी आणि कच्च्या तेलाच्या दरातील घसरण याचा परिणाम सोन्या-चांदीच्या दरात झाला आहे.

आकडेवारीनुसार, 24 कॅरेट सोन्याचा दर आठवडाभरात 6,761 रुपयांनी वाढला. त्यामुळे 10 ग्रॅम सोन्याची किंमत 1,49,621 रुपयांवर पोहोचली आहे. मागील आठवड्यात हाच दर 1,42,860 रुपये होता.

दागिन्यांसाठी मोठ्या प्रमाणात वापरल्या जाणाऱ्या 22 कॅरेट सोन्याच्या दरातही वाढ झाली आहे. या सोन्याचा भाव 6,093 रुपयांनी वाढून 1,37,053 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला. याआधी 22 कॅरेट सोन्याचा दर 1,30,860 रुपये होता.

18 कॅरेट सोन्याच्या किमतीतही वाढ झाली असून, त्याचा भाव 1,12,216 रुपये प्रति 10 ग्रॅमवर गेला आहे. मागील आठवड्यात हा दर 1,07,145 रुपये होता. सोन्याबरोबरच चांदीच्या दरातही जोरदार तेजी दिसून आली. एका आठवड्यात चांदी 13,086 रुपयांनी महाग झाली असून, तिचा भाव 2,31,381 रुपये प्रति किलोवर पोहोचला आहे. मागील आठवड्यात हा दर 2,18,295 रुपये होता.







