Go First Airlines News :नवी दिल्ली : गो फर्स्टच्या विमानाने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी महत्वाची बातमी समोर आली आहे. गो फर्स्टने पुन्हा एकदा ३० मे पर्यंतची सर्व उड्डाणे रद्द केली आहेत. तसेच, कंपनीने प्रवाशांना त्यांचा परतावा लवकरात लवकर परत करण्याचे आश्वासन दिले आहे. गो फर्स्टने त्यांच्या अधिकृत ट्विटर अकाउंटवरून ही माहिती दिली आहे. (Increased concern of passengers of Go First! All flights canceled till May 30)
अपरिहार्य कारणामुळे उड्डाणे रद्द
कंपनीच्या म्हणण्यानुसार काही ऑपरेशनल कारणांमुळे उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत. प्रवाशांना झालेल्या गैरसोयीबद्दल कंपनीने माफीही मागितली आहे. (Go First Airlines News)
डीजीसीएने गो फर्स्ट एअरलाइन्सकडे कार्यरत असणाऱ्या त्यांच्या सर्व विमानांची माहिती मागितली आहे. तसेच त्यांच्या कर्मचाऱ्यांविषयी देखील गो फर्स्टने लवकरात लवकर माहिती देण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानंतर लगेच दुसऱ्या दिवशी गो फर्स्टने त्यांची 30 मे पर्यंतची सर्व विमानं रद्द करण्याची घोषणा केली. (Go First Airlines News) सुरुवातील फक्त दोन दिवसांसाठी विमानांची उड्डाणं रद्द करण्यात आली होती, मात्र आता ही उड्डाणं 30 मे पर्यंत रद्द करण्यात आल्याचं कंपनीकडून सांगण्यात येत आहे.
याआधीदेखील 9 मे पर्यंत गो फर्स्टने ऑपरेशनल कारणास्तव त्यांच्या सर्व विमानांची उड्डाणं रद्द केली होती. गो फर्स्ट सध्या आर्थिक संकटाचा सामाना करत आहे. तसेच डीजीसीएने गो फर्स्टला कारणे दाखवा नोटीस देखील बजावली होती. (Go First Airlines News) त्यानंतर गो फर्स्टने NCLT कडे धाव घेतली होती, पण तिथूनही कंपनीला निराशा मिळाली. एनसीएलटीने गो फर्स्टच्या याचिकेवर सुनावणी करताना, आयबीसी अंतर्गत कोणतीही तरतूद नसल्याचे सांगत कंपनीला अंतरिम दिलासा देण्यास नकार दिला.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Mumbai News : यापुढे बालवाडी, नर्सरी सुरु करण्यासाठी शिक्षण विभागाची परवानगी घ्यावी लागणार
Pune News : बार्टीच्या आश्वासनानंतर संशोधक विद्यार्थ्यांचे आंदोलन मागे
Kadethan News : बेकायदा माती उत्खनन करणा-या ६ जणांवर गुन्हा दाखल