बंगळुरू : अनेक महिलांकडून लैंगिक छळाचे आरोप असलेले माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा यांचे नातू आणि खासदार प्रज्ज्वल रेवण्णा यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. कथित कर्नाटक सेक्स स्कैंडल प्रकरणाची चौकशी एसआयटीमार्फत सुरू आहे. या प्रकरणात आता प्रज्वल रेवण्णा यांच्या अटकेसाठी ग्लोबल लूकआउट नोटीस जारी करण्यात आली आहे. स्वतः कर्नाटकचे गृहमंत्री परमेश्वर यांनी ही माहिती दिली. कथित कर्नाटक सेक्स स्कँडल प्रकरणी खासदार प्रज्ज्वल रेवण्णा यांच्याविरोधात आता सरकार अॅक्शन मोडमध्ये आले आहे.
या प्रकरणावर मौन सोडत प्रज्ज्वल यांनी तपास करणाऱ्या विशेष तपास पथक म्हणजेच एसआयटीसमोर हजर राहण्यासाठी 7 दिवसांचा अवधी मागितला आहे. यावर परमेश्वर यांनी सांगितले की, ’24 तासांपेक्षा पाल जास्त वेळ देण्याची तरतूद नाही. प्रज्ज्वल रेवण्णा परदेशात गेल्याची माहिती मिळताच ग्लोबल लूकआउट नोटीस जारी करण्यात आली आहे. आम्ही सर्व बंदरे आणि विमानतळांना लूकआउट नोटीसबद्दल माहिती दिली आहे.’ जगातील सर्व इमिग्रेशन पॉईंट्सना ही नोटीस पाठवण्यात आली आहे.