Gandhi Jayanti 2024 : आज 2 ऑक्टोबर म्हणजेच महात्मा गांधी जयंती. त्यांचा जन्म 2 ऑक्टोबर 1869 रोजी गुजरातमधील पोरबंदर येथे झाला. या निमित्तानं जगभरातील राजकीय नेत्यांनी, सेलिब्रिटींनी, खेळाडूंनी महात्मा गांधीजींना अभिवादन केलं आहे.
राष्ट्रपिता महात्मा गांधी हे एक लोकप्रिय प्रतिष्ठित व्यक्तिमत्व आहे. महात्मा गांधीजींना बापू असंही म्हटलं जातं. बापूंचे विचार हे आजही आपल्यासाठी दिशादर्शकाचं काम करतात. जर तुम्ही आयुष्यात कधी निराश झालात तर बापूंचे हे प्रेरणादायी विचार नक्की वाचा.
-माणूस म्हणून आपली सर्वात मोठी क्षमता जग बदलणे नाही तर स्वतःला बदलणे आहे.
-तुम्ही आज काय करत आहात,यावर तुमचे भविष्य अवलंबून असते.
-ज्या दिवशी प्रेमाची शक्ती सत्तेच्या प्रेमावर विजय मिळवेल, त्या दिवशी जग शांततेचा अनुभव घेईल.
-राग आणि असहिष्णुता हे आपले शत्रू आहेत. स्वतःला शोधण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे इतरांच्या सेवेत स्वतःला देऊन टाकणे. तुम्हाला जगात दिसणारा बदल तुम्हीच असला पाहिजे.
-सत्याला कधीच हरवता येत नाही, त्याला नेहमीच जिंकता येते.
-तुमच्या सवयी सकारात्मक ठेवा कारण तुमच्या सवयी तुमचे मूल्य बनतात. तुमची मूल्ये सकारात्मक ठेवा कारण तुमची मूल्ये तुमचे भाग्य बनतात.
-माझे जीवन हाच माझा संदेश आहे.
-‘सत्य’ आणि ‘अहिंसा’ हाच माझा धर्म आहे. ‘सत्य’ हा माझा देव आहे आणि ‘अहिंसा’ ही त्या देवाची आराधना आहे.
-चांगल्या बदलाची सुरूवात आधी स्वत:पासून करा.
-मौनाने क्रोधावर विजय मिळवता येतो.