श्रीहरीकोटा: अनेक अडथळ्यांची शर्यत आणि आव्हानांचा सामना करत अखेर भारताच्या ‘गगनयान’च्या प्रो मॉड्युलनं आज गगनभरारी घेतली. गगनयान अभियानाची पहिली चाचणी यशस्वी झाली. या यशस्वी चाचणीमुळे भारतानं अवकाश मोहिमेत आणखी एक इतिहास रचला आहे. शनिवारी सकाळी 10 च्या सुमारास इस्रोच्या श्रीहरीकोटा इथल्या सतीश धवन अंतराळ केंद्रावरुन गगनयानचं क्रू मॉडेल लाँच करण्यात आलं. यालाच टेस्ट व्हिकल अबॉर्ट मिशन-1 आणि टेस्ट व्हिकल डेवलपमेंट फ्लाईट असंही म्हटलं जात आहे.
इस्रोच्या गगनयान मोहिमेअंतर्गत श्रीहरीकोटा येतेच पहिली चाचणी उड्डाण प्रक्षेपित करण्यात आलं. या पूर्वी ही चाचणी खराब हवामान आणि तांत्रिक कारणामुळे रद्द झाली होती. मात्र, आता तांत्रिक अडचणी दूर झाल्या असून उड्डाण चाचणी सकाळी दहा वाजता करण्यात आली. दरम्यान, गगनयान मोहिमेदरम्यान अंतराळवीरांची सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी ही चाचणी उड्डाण करण्यात येणार आहे. या चाचणी दरम्यान मॉड्यूल अंतराळात नेलं जाईल. त्यानंतर ते ठराविक उंचीपर्यंत नेऊन पुन्हा पृथ्वीवर परत आणून बंगालच्या उपसागरात उतरवले जाईल. इस्रोकडून या उड्डाण चाचणीला अबॉर्ट टेस्ट असं नाव देण्यात आलं आहे.