Ashutosh Gopal Tandon: लखनऊ: उत्तर प्रदेश सरकारमधील माजी मंत्री आणि आमदार आशुतोष टंडन यांचे आज दीर्घ आजाराने निधन झाले. आशुतोष टंडन हे यापूर्वी नगरविकास मंत्री होते. त्यांच्यावर लखनऊच्या मेदांता रुग्णालयात उपचार सुरू होते. ते सध्या लखनऊ पूर्व मतदारसंघातून आमदार होते. भाजपचे ज्येष्ठ नेते लालजी टंडन यांचे पुत्र होते. आशुतोष टंडन हे दीर्घकाळापासून कर्करोगाने त्रस्त होते.