नवी दिल्ली: बिहारचे माजी मुख्यमंत्री कर्पूरी ठाकूर यांना भारतरत्न (मरणोत्तर) देऊन गौरविण्यात येणार आहे. बिहारचे दोन वेळा मुख्यमंत्री राहिलेले कर्पूरी ठाकूर मागासवर्गीयांच्या हिताचे समर्थन करण्यासाठी ओळखले जात होते. केंद्र सरकारने ही घोषणा अशा वेळी केली आहे, जेव्हा एका दिवसानंतर म्हणजेच 24 जानेवारीला जननायक कर्पूरी ठाकूर यांची 100 वी जयंती आहे.
कर्पूरी ठाकूर यांना भारतरत्न देऊन सन्मानित करण्याची मागणी अनेक दिवसांपासून होत होती. मंगळवारी (२२ जानेवारी) जेडीयू नेते केसी त्यागी यांनी ठाकूर यांना भारतरत्न देण्याची तसेच त्यांच्या नावाने विद्यापीठ सुरू करण्याची मागणी केली होती.
कर्पूरी ठाकूर हे बिहारचे होते आणि ते ‘जननायक’ म्हणून ओळखले जातात. ते काही काळ बिहारचे मुख्यमंत्री झाले. मुख्यमंत्री म्हणून त्यांचा पहिला कार्यकाळ डिसेंबर 1970 ते जून 1971 पर्यंत राहिला. त्यानंतर डिसेंबर 1977 ते एप्रिल 1979 पर्यंत त्यांनी मुख्यमंत्रीपद भूषवले. पहिल्यांदा ते समाजवादी पक्ष आणि भारतीय क्रांती दलाच्या सरकारमध्ये मुख्यमंत्री झाले, तर दुसऱ्यांदा ते जनता पक्षाच्या सरकारमध्ये मुख्यमंत्री झाले.