नवी दिल्ली : लोकसभेचे अधिवेशन 24 जूनपासून सुरु झाले आहे. राष्ट्रवादी द्रौपदी मुर्मू यांनी 18 व्या लोकसभेला संबोधित करताना देशातील वयस्कर लोकांसाठी एक आनंदाची बातमी दिली आहे. 70 वर्षापुढील सर्व व्यक्तींचा आयुष्यमान योजनेअंतर्गत मोफत उपचार होणार आहे.
18 व्या लोकसभेचे पहिले अधिवेशन सुरु झाले आहे. आज राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचे अभिभाषण झाले. यावेळी त्यांनी सरकारने केलेल्या कामाचा उल्लेख केला. विशेष म्हणजे भारतीय जनता पक्षाने लोकसभा निवडणुकीच्या वेळी प्रसिद्ध केलेल्या जाहीरनाम्यातही याचा उल्लेख केला आहे.
यावेळी राष्ट्रवादी द्रौपदी मुर्मू यांनी पुढे सांगितले की, नवीन सरकारमध्ये 70 वर्षांवरील सर्व व्यक्तींना आयुष्यमानचा लाभ देत आहे. एवढेच नाही तर सरकार सातत्याने शेतक-यांसाठी काम करत आहे. 20 हजार कोटी रुपये शेतक-यांच्या खात्यात ट्रान्सफर करण्यात आले आहेत. यातून शेतकरी स्वावलंबी बनले आहेत.
भाजपाच्या घोषणापत्रामध्ये 70 वर्षापुढील सर्वांना मोफत उपचार दिले जातील असे सांगण्यात आलं होतं. पंतप्रधान मोदी यांनी यासंदर्भात भाष्य केलं होतं. त्यावेळी ते म्हणाले होते की, प्रत्येक वयस्कर व्यक्तीला त्याच्या उपचारादरम्यान चिंता असते. मध्यमवर्गासाठी ही चिंता जास्त गंभीर असते. त्यामुळे भाजपने आता नवा संकल्प केला आहे. प्रत्येक 70 वर्षापुढील व्यक्तीला आयुष्यमान भारत योजनेंतर्गत आणला जाईल आणि त्यांच्यावर मोफत उपचार केले जातील.