भोपाळ : मध्य प्रदेशातील छिंदवाडा येथे एका युवकाने आपल्या कुटुंबातील 8 जणांची हत्या करुन स्वत:ही गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. आरोपीने आधी पत्नीवर कु-हाडीने वार केले. त्यानंतर आई, वडिल बहिण, भाऊ, वहिनी आणि दोन भाच्या आणि पुतणे यांच्यी हत्या केली. आदिवासी भागातील बोडलकचार गावात हे सामुहिक हत्याकांड घडले आहे.
या घटनेवर पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी हा मानसिकदृष्ट्या अस्थिर होता. संशयित आरोपीचे 21 मे रोजी लग्न झाले होते. हत्येचे नेमके कारण अद्याप समजू शकले नाही, याशिवाय तो कोणत्या नशेच्या अमलाखाली होता का? हे तपासलं जात आहे.
रिपोर्टनुसार, त्याच्यामध्ये आणि त्याच्या पत्नीमध्ये कडाक्याचे भांडण झाले होते. त्यानंतर त्याने संपूर्ण कुटुंबालाच संपवल आहे. यावेळी पोलीसांनी घटनास्थळावरुन कु-हाड जप्त केली आहे.