नवी दिल्ली: अंमलबजावणी संचालनालयाने (ED) दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पार्टीचे (AAP) प्रमुख अरविंद केजरीवाल यांना चौकशीसाठी बोलावले आहे. ईडीने त्यांना दिल्ली मद्य धोरण प्रकरणी 21 डिसेंबरला हजर राहण्यास सांगितले आहे.
यापूर्वी 2 नोव्हेंबरला ईडीने अरविंद केजरीवाल यांना चौकशीसाठी नोटीस पाठवली होती, मात्र त्यांनी ही नोटीस बेकायदेशीर ठरवून ती मागे घेण्याची मागणी केली होती. माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया आणि आपचे राज्यसभा खासदार संजय सिंह हे अबकारी धोरणाशी संबंधित प्रकरणांमध्ये तुरुंगात आहेत.