नवी दिल्ली: इंडोनेशियातील तलाउड बेटांवर मंगळवारी (9 जानेवारी) 6.7 तीव्रतेचा भूकंप जाणवला. नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजी (एनसीएस) नुसार, भूकंपाचा केंद्रबिंदू जमिनीच्या खाली 80 किमी खोलीवर होता. भारतीय वेळेनुसार रात्री 2.18 च्या सुमारास भूकंपाचे धक्के जाणवले.
नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजी (NCS) ने X (पूर्वीचे ट्विटर) वर पोस्ट करत याबाबत माहिती दिली की, भूकंपाचा केंद्रबिंदू पृथ्वीच्या पृष्ठभागापासून 80 किमी खाली होता. भूकंपाचे हे धक्के इंडोनेशियातील तलाउड बेटावर जाणवले. युनायटेड स्टेट्स जिऑलॉजिकल सर्व्हे (USGS) ने सांगितले की, गेल्या आठवड्यात गुरुवारी इंडोनेशियातील बलाई पुंगुट येथे भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले.
जीवित किंवा मालमत्तेच्या हानीचे कोणतेही वृत्त नाही
इंडोनेशियामध्ये 6.7 तीव्रतेचा भूकंप होऊनही, अद्याप कोणतीही जीवित किंवा मालमत्तेची हानी झाल्याचे वृत्त नाही. इंडोनेशियामध्ये दररोज भूकंपाचे धक्के जाणवत आहेत. त्यामागील मुख्य कारण म्हणजे या ठिकाणची भौगोलिक रचना. इंडोनेशिया हे पॅसिफिक महासागराच्या रिंग ऑफ फायरवर वसलेले आहे, त्यामुळे तेथे सतत भूकंप होत असतात. रिंग ऑफ फायर पॅसिफिक, कोकोस, भारतीय-ऑस्ट्रेलियन, जुआन डी फुका, नाझका, उत्तर अमेरिकन आणि फिलीपीन टेक्टोनिक प्लेट्सला जोडते.
Earthquake of Magnitude:6.7, Occurred on 09-01-2024, 02:18:47 IST, Lat: 4.75 & Long: 126.38, Depth: 80 Km ,Location: Talaud Islands,Indonesia for more information Download the BhooKamp App https://t.co/Ughl0I9JG3 @Indiametdept @ndmaindia @Dr_Mishra1966 @KirenRijiju @Ravi_MoES
— National Center for Seismology (@NCS_Earthquake) January 8, 2024
जपानमध्ये भूकंपाचे धक्के:
जपानमध्ये नवीन वर्षाच्या निमित्ताने म्हणजेच १ जानेवारी रोजी भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले. भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर 7.6 इतकी मोजली गेली. त्यामुळे तेथे सुनामीचा इशाराही देण्यात आला होता. जपानमधील भूकंपामुळे आतापर्यंत 100 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे.