नवी दिल्ली: जपानमध्ये मंगळवारी भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले. पीटीआय या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, दुपारी 2:29 वाजता जपानच्या होन्शु (Japan Earthquake Today) च्या पश्चिम किनार्याजवळ 6.0 रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप झाला. आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार, भूकंपानंतर कोणतीही जीवितहानी झाल्याची माहिती नाही. न्यूज एजन्सी एएफपीनुसार, जपान सरकारचे म्हणणे आहे की, 6.0 रिश्टर स्केल तीव्रतेच्या भूकंपानंतर अद्याप त्सुनामीचा इशारा नाही.
जपानच्या हवामानशास्त्राचे म्हणणे आहे की, जपानच्या समुद्राच्या किनार्याजवळ भूकंप झाला. 1 जानेवारी रोजी देखील याच मध्य जपानच्या काही भागांना शक्तिशाली भूकंपाने उद्ध्वस्त केले होते. भूकंपाच्या धक्क्यांमुळे मोठ्या प्रमाणावर विनाश झाला आणि मृतांची संख्या 200 हून अधिक झाली. 1 जानेवारीला झालेल्या भूकंपातील 100 लोक अद्याप बेपत्ता असल्याचे हवामान खात्याच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. नवीन वर्षाच्या दिवशी ७.५ रिश्टर स्केलच्या भूकंपामुळे अनेक इमारती उद्ध्वस्त झाल्या. तसेच, नोटो प्रायद्वीपवरील पायाभूत सुविधांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.