गांधीनगर: गुजरातच्या गांधीनगरमधून एक मोठी बातमी समोर येत आहे. गांधीनगरला भूकंपाचे धक्के बसले आहेत. भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर 3.5 इतकी मोजली गेली. भूकंपाचा केंद्रबिंदू गांधीनगरपासून उत्तर-पश्चिमेला 20 किलोमीटर अंतरावर होता.
भूकंपामुळे कोणतीही मोठी हानी झालेली नाही. काही इमारतींमध्ये तडे गेल्याची नोंद आहे, परंतु कोणतीही दुखापत झाली नाही. नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजी (NCS) नुसार, गुजरात भूकंप प्रवण क्षेत्रात येते. राज्याने यापूर्वी अनेक भूकंप अनुभवले आहेत. भूकंपानंतर नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. प्रशासन लोकांना सावध राहण्याचा सल्ला देत आहे.