उत्तराखंड : उत्तराखंडमधून एक मोठी बातमी समोर येत आहे. शनिवारी सकाळी येथे हेलिकॉप्टरचा अपघात झाल्याची माहिती मिळत आहे. शनिवारी सकाळी आठच्या सुमारास हेलिकॉप्टर एअरलिफ्ट केलं जातं असताना त्यावेळी हा अपघात घडला. Kestrel Aviation चे हे हेलिकॉप्टर MI-17 विमानानं दुरुस्तीसाठी नेले जात होतं.
मिळालेल्या माहितीनुसार, 24 मे 2024 रोजी एका हेलिकॉप्टरमध्ये लँडिंग करताना तांत्रिक बिघाड झाला होता. त्यामुळे इमर्जन्सी लँडिंग करावं लागलं. ती दुरुस्त करण्यासाठी भारतीय विमानतळाच्या एमआय 17 हेलिकॉप्टरच्या साहाय्यानं ते टांगून गौचर हवाई पट्टीवर नेण्यात येत होतं. या वेळी MI 17 डिस्सेम्बल झालं. अशाप्रकारे पायलटला लटकलेलं हेलिकॉप्टर खाली टाकावं लागलं.
आणि MI-17 ने आपला तोल गमावला..
जिल्हा पर्यटन अधिकारी राहुल चौबे यांनी सांगितले की, शनिवारी एमआय-17 विमानाच्या मदतीने हेलिकॉप्टर गौचर हवाईपट्टीत दुरुस्तीसाठी नेण्याची योजना होती. थोडे अंतर कापल्यानंतर हेलिकॉप्टरचं वजन आणि वाऱ्यामुळे MI-17 ने आपला तोल गमावला, त्यामुळे हेलिकॉप्टरला थारू कॅम्पजवळ उतरावं लागलं. हेलिकॉप्टरमध्ये प्रवासी किंवा सामान नव्हतं. माहिती मिळताच बचाव पथक घटनास्थळी पोहोचले. टीम परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे. यामध्ये कोणतीही जीवित किंवा वित्तहानी झालेली नाही.