नवी दिल्ली: दिल्ली सरकारचे माजी मंत्री सत्येंद्र जैन १८ महिन्यांनंतर तुरुंगातून बाहेर येणार आहेत. मनी लाँड्रिंग प्रकरणात राऊस ॲव्हेन्यू कोर्टाने त्यांना जामीन मंजूर केला आहे. न्यायालयाकडून सुटका आदेशही जारी करण्यात आला आहे. सत्येंद्र जैन आजच जेल बाहेर पडणार आहेत. न्यायालयाने जैन यांना काही अटींसह दिलासा दिला आहे. त्यांना ५० हजार रुपयांचा बाँड भरावा लागणार आहे.
आम आदमी पक्षाच्या सरकारमध्ये मंत्री राहिलेल्या सत्येंद्र जैन यांच्यावर २००९-१० आणि २०१०-११ मध्ये बनावट कंपन्या तयार केल्याचा आरोप आहे. या कंपन्यांमध्ये अकिंचन डेव्हलपर्स प्रायव्हेट लिमिटेड, इंडो मेटल इम्पेक्स प्रायव्हेट लिमिटेड, प्रयास इन्फो सोल्युशन्स प्रायव्हेट लिमिटेड आणि मंगलायतन प्रोजेक्ट्स प्रायव्हेट लिमिटेड यांचा समावेश आहे.