दिल्ली : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना दिल्ली सरकारच्या कथित मद्य धोरण घोटाळ्याप्रकरणी सीबीआयने त्यांना अटक केली आहे. यावेळी अचानक अरविंद केजरीवाल यांची शुगर लेव्हल डाऊन झाली आणि त्यांची प्रकृती बिघडली.
#WATCH | Delhi CM Arvind Kejriwal was brought out of the courtroom for tea and biscuits after his sugar level dropped. He was taken to the Ahlmad room. pic.twitter.com/XOqHLiPVyw
— ANI (@ANI) June 26, 2024
यानंतर केजरीवाल यांना काही वेळ कोर्टरुममधून बाहेर नेऊन त्यांना चहा-बिस्कीट देण्यात आलं. सीबीआयने अरविंद केजरीवाल यांना दिल्लीच्या राऊस एव्हेन्यू न्यायालयात हजर करण्यात आलं. कोर्टात हजर केल्यानंतर त्यांची तब्येत बिघडली.
अरविंद केजरीवाल यांनी ईडीने 21 मार्च रोजी अटक केली होती. तेव्हापासून ते तुरुंगात आहेत. लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी सर्वोच्च न्यायालयाने त्यांना जामीन मंजूर केला होता.