दिल्ली : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना दिल्ली सरकारच्या कथित मद्य धोरण घोटाळ्याप्रकरणी सीबीआयने त्यांना अटक केली आहे. सीबीआयने केजरीवाल यांना दिल्लीच्या राऊस एव्हेन्यू न्यायालयात हजर केले होते, ज्याठिकाणी आम आदमी पक्षाच्या (आप) प्रमुखाची चौकशी करण्यासाठी तपास यंत्रणेने त्यांच्या कोठडीची मागणी केली होती.
CBI informs the court that they have formally arrested Delhi CM Arvind Kejriwal and supplies all the required documents.
— ANI (@ANI) June 26, 2024
सीबीआयने मंगळवारी तिहार तुरुंगात अरविंद केजरीवाल यांची चौकशी केली आणि दारु घोटाळ्याप्रकरणी त्यांचे जबाब नोंदवले. सीबीआयच्या अटकेनंतर आज सुप्रीम कोर्टात अरविंद केजरीवाल यांच्या याचिकेवर सुनावणी होणार आहे. ज्यात उच्च न्यायालयाच्या जामिनावर स्थगिती देण्याविरोधात सर्वोच्च न्यायालयात दाद मागितली आहे.
अरविंद केजरीवाल यांचे वकील विक्रम चौधरी यांनी या अटकेचा विरोध केला. चौधरी म्हणाले, दिल्लीचे मुख्यमंत्री दुसऱ्या एका प्रकरणात अगोदरच न्यायालयीन कोठडीत आहेत. असं असूनही त्यांना आता सीबीआयने अटक केली आहे. याबाबतचा कुठला तरी आदेश पारित झाला आहे आणि आम्हाला त्याची कल्पनाच नाही. ज्या पद्धतीने या सगळ्या घटना घडत आहेत ते पाहता हा चिंतेचा विषय आहे. ही अटक संविधानाच्या कलम 21 चं उल्लंघन आहे. केजरीवाल यांना सीबीआयने अटक केल्याची बातमी आम्हाला प्रसारमाध्यमांद्वारे समजली. त्यामुळे आम्ही न्यायालयाकडे मागणी केली आहे की सीबीआयने केजरीवाल यांच्या अटकेसाठी दाखल केलेला अर्ज आम्हालाही दिला जावा.
दरम्यान, विक्रम चौधरी यांचा न्यायालयातील युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायमूर्ती अमिताभ रावत म्हणाले, “आम्हाला कल्पना आहे की केजरीवाल न्यायालयीन कोठडीत आहेत. त्यामुळेच सीबीआयने 24 जून रोजी न्यायालयाकडे केजरीवालांच्या चौकशीसाठी अर्ज केला होता.” त्यानंतर ईडीनेही त्यास सहमती दर्शवली आहे. सीबीआयने न्यायालयाकडे अधिकृतरित्या केजरीवालांच्या अटकेसाठी अर्ज केला होता. न्यायालयाने त्यास हिरवा कंदील दाखवला आहे. मात्र अद्याप सीबीआयने त्यांना अटक केलेली नाही.
अरविंद केजरीवाल यांनी ईडीने 21 मार्च रोजी अटक केली होती. तेव्हापासून ते तुरुंगात आहेत. लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी सर्वोच्च न्यायालयाने त्यांना जामीन मंजूर केला होता.