तुमकूर (कर्नाटक): कर्नाटकातील तुमकूर (Crime News) जिल्ह्यातून एक मन सुन्न करणारी घटना समोर आली आहे. आपल्या वडिलांच्या मृत्यूला आईच जबाबदार असून तिने करणी-बाधा केली होती, या संशयावरून पोटच्या ३३ वर्षीय लेकीने आपल्या आईची निर्घृण हत्या केली आहे.

सुचित्रा हिच्या वडिलांचे सुमारे 18 महिन्यांपूर्वी आरोपी निधन झाले होते. वडिलांवर प्रचंड प्रेम असलेल्या सुचित्राला हा धक्का पचवता आला नाही. मात्र, हा मृत्यू नैसर्गिक नसून त्यामागे काहीतरी ‘वेगळं’ कारण असावं, अशी शंका तिच्या मनात घर करून बसली. मृत्यूचे नेमकं कारण काय असेल हे शोधण्यासाठी तिने एका ज्योतिषाची मदत घेतली. त्या ज्योतिषाने सांगितले कि, “तुझ्या वडिलांचा मृत्यू नैसर्गिक नसून तुझ्या आईने केलेल्या करणीमुळे झाला आहे,”
ज्योतिषाच्या शब्दांवर आंधळा विश्वास ठेवून सुचित्राने आईला संपवण्याचा कट रचला. आई गाढ झोपेत असताना सुचित्राने उशीने त्यांचे तोंड दाबून त्यांचा जीव घेतला. हत्या केल्यानंतर तिने बनाव रचला आणि कोणाला शंका येऊ नये म्हणून घाईघाईने अंत्यसंस्काराची तयारीही केली.
सुचित्राचं वागण पाहून नातेवाईकांना संशय आला. त्यांनी अंत्यसंस्कार थांबवून पोलिसांना बोलावले. पोलिसांनी जेव्हा सुचित्राची कसून चौकशी केली, तेव्हा तिने गुन्ह्याची कबुली दिली.







