Madhya Pradesh Exit Poll नवी दिल्ली: देशातील मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगड, तेलंगणा आणि मिझोराम या पाच राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका पार पडल्या. शेवटच्या दिवशी, म्हणजेच 30 नोव्हेंबर रोजी तेलंगणात विधानसभेच्या एकूण 119 जागांसाठी मतदान झाले. हे मतदान संपल्यानंतर एक्झिट पोलचे आकडे समोर येत आहेत.
येत्या 3 डिसेंबरला सर्व राज्यातील मतमोजणी होणार आहे. त्यापूर्वी एक्झिट पोलच्या आकडेवारीवरुन निकालांचा अंदाज लावला जात आहे. एक्झिट पोलनुसार, मध्य प्रदेशात काँग्रेस बाजी मारण्याची शक्यता आहे. येथे काँग्रेसला 111-121, तर भाजपला 106-116 जागा मिळण्याची शक्यता आहे. मध्य प्रदेशमध्ये बहुमताचा आकडा 116 आहे.