बेंगळुरु : कर्नाटकची राजधानी बेंगळुरुमध्ये सोमवारी एक दु:खद घटना घडली आहे. सोमवारी तिथे पत्रकार परिषद सुरु असतानाच कॉंग्रेस नेत्याचा हृदय विकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू झाला आहे. पत्रकार परिषद सुरु असतानाच कॉंग्रेस नेता खुर्चीवरुन खाली कोसळला, या घटनेचा व्हिडिओ समोर आला आहे.
कुरुपा समुदाय संघाचे अध्यक्ष आणि काँग्रेस नेते सी. के. रविचंद्रन (वय-63) असे त्यांचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी रविचंद्रन मुख्यमंत्री सिद्दारमय्या यांचे समर्थन करण्यासाठी पत्रकार परिषद घेत होते. त्याचवेळी त्यांना अचानक हार्ट अटॅक आला व ते हातात माईक असतानाच खुर्चीवरून खाली कोसळले. त्यावेळी त्यांचा जागीच मृत्यू झाला. त्यांच्या मृत्यूने काँग्रेस पार्टी आणि स्थानिय समुदायात शोककळा पसरली आहे.
TRIGGER WARNING !!!!
Karnataka Congress’ CK Ravichandran dies of Cardiac Arrest during a LIVE press conference at the press club near Cubbon Park. pic.twitter.com/Ycj94tVF8L
— Waseem ವಸೀಮ್ وسیم (@WazBLR) August 19, 2024
कर्नाटकाचे मुख्यमंत्री सिध्दरामैया यांनीही रवीचंद्रन यांच्या मृत्यूबाबत शोक व्यक्त केला आहे. राज्यपालांच्या अभियोजनाच्या आदेशाविरोधात कर्नाटक राज्य मागासवर्ग आणि अल्पसंख्याक असोसिएशनकडून बंगळुरुच्या प्रेस क्लबमध्ये पत्रकार परिषद घेत असताना असोसिएशनचे सदस्य आणि आमच्या पक्षाचे कार्यकर्ते सी.के. रवीचंद्रन यांना हृदय विकाराचा धक्का लागला आणि त्यांचा मृत्यू झाला, असे सिध्दरामैय्या म्हणाले.
यावेळी पोलिसांनी सांगितले की, रविचंद्रन यांना हृदयविकाराचा झटका आल्यानंतर उपचारासाठी कनिंगहॅम रोडवरील फोर्टिस रुग्णालयात नेण्यात आले, परंतु रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता.
दरम्यान, रविचंद्रन हे काँग्रेसच्या प्रचार समितीचे सदस्य होते. म्हैसूर जमीन घोटाळा प्रकरणी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्याविरुद्ध खटला चालवण्यास राज्यपालांनी परवानगी दिली आहे. राज्यपालांच्या या आदेशाविरोधात रविचंद्रन बेंगळुरु येथे प्रेस क्लबमध्ये पत्रकार परिषदेत बोलत होते.