रायपूर: छत्तीसगड विधानसभेच्या 90 जागांसाठी मतमोजणी सुरू आहे. सुरुवातीला कल काँग्रेसकडे होता. पण, कालांतराने भाजपने आघाडी मिळवली आणि काँग्रेसच्या विजयाच्या आशा मावळल्या. 12 वाजेपर्यंतच्या ट्रेंडनुसार भाजप 90 पैकी 55 जागांवर आघाडीवर आहे. काँग्रेस 33 जागांवर आघाडीवर आहे, तर इतर 2 जागांवर आघाडीवर आहे. छत्तीसगडमध्ये काँग्रेसचा पराभव होत आह. परंतु, जनता इतकी नाराज झाली आहे की सरकारचे 11 मंत्रीही मागे पडले आहेत. फक्त कावासी लखमा हे मंत्री आहेत जे त्यांच्या जागेवरून लीडवर आहेत. छत्तीसगडमध्ये विधानसभेच्या 90 जागा असून 7 आणि 17 नोव्हेंबर रोजी दोन टप्प्यात मतदान झाले.
1- कावर्धामधून विजय शर्मा पुढे, मंत्री मोहम्मद अकबर मागे.
2- अबिकापूरमधून टी.एस.सिंहदेव मागे
3- सजामधून ईश्वर साहू पुढे, मंत्री रवींद्र चौबे मागे.
4- पाटणमधून मुख्यमंत्री भूपेश बघेल मागे, विजय बघेल पुढे.
5- कोंडागावमधून लता उसेंडी मंत्री मोहन मरकाम मागे.
6- मंत्री ताम्रध्वज साहू मागे
7- मंत्री कावसी लखमा मागे
8- मंत्री अमरजीत भगत मागे
9- मंत्री रुद्र गुरु मागे
10- मंत्री अनिला भेडिया मागे
छत्तीसगडमध्ये 1 कोटी 55 लाखांहून अधिक मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता. मतमोजणीच्या सुरुवातीच्या ट्रेंडमध्ये काँग्रेस पुढे होती, पण आता परिस्थिती बदलली आहे. आतापर्यंत समोर आलेल्या 90 जागांच्या ट्रेंडमध्ये भाजप 55 जागांवर तर काँग्रेस 31 जागांवर आघाडीवर आहे.
मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयातून मिळालेल्या माहितीनुसार, 33 जिल्हा मुख्यालयात 8 वाजता मतमोजणीला सुरुवात झाली. प्रथम पोस्टल मतपत्रिकांची मोजणी करण्यात आली आणि नंतर ईव्हीएम मशीन उघडण्यात आली. राज्यातील नक्षलग्रस्त भागात मतमोजणीसाठी विशेष सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे.