China Pneumonia outbreak : नवी दिल्ली : कोरोनानंतर चीन पुन्हा एकदा नव्या आजाराशी झुंज देत आहे. चीनमध्ये न्यूमोनिया वेगाने पसरत आहे. त्यामुळे रुग्णालयात दाखल होणाऱ्या मुलांची संख्या झपाट्याने वाढत आहे. या आजाराचा वाढता प्रादुर्भाव पाहता डब्ल्यूएचओनेही आपली चिंता व्यक्त केली आहे. डब्ल्यूएचओने चीनकडून सविस्तर माहिती मागवण्यात आली आहे. ज्यावर चीनने म्हटले आहे की, देशात पसरणारा हा आजार सामान्य आहे.
चीनकडून मिळालेल्या उत्तरानंतर जागतिक आरोग्य संघटनेने (WHO)असा दावा केला आहे की, ऑक्टोबर 2023 च्या मध्यापासून ते चीनच्या आरोग्य विभागाकडे लक्ष ठेऊन आहेत. उत्तर चीनमधील मुलांमध्ये श्वसनाच्या आजारांमध्ये सतत वाढ दर्शविते, जे खूप चिंताजनक आहे. यूएन आरोग्य एजन्सीने बुधवारी उशिरा घोषणा केली की त्यांनी बीजिंगला अधिक डेटा मागवला आहे.
डब्ल्यूएचओने सांगितले की त्यांनी गुरुवारी चिनच्या आरोग्य अधिकार्यांसोबत टेलिकॉन्फरन्स आयोजित केली होती, ज्यामध्ये त्यांनी उत्तर चीनमधील मुलांमधे श्वसनाच्या आजारांबद्दल माहिती घेतली. ज्यावर चिनीने सर्वकाही व्यवस्थित असल्याचे सांगितले.
डब्ल्यूएचओचे परिस्थितीवर लक्ष
डब्ल्यूएचओने सांगितले आहे की, ‘सध्या ते परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहे. यासोबतच आम्ही चीनमधील राष्ट्रीय अधिकाऱ्यांच्या संपर्कात आहोत. आरोग्य एजन्सीने सांगितले की त्यांनी चीनला कठोरपणे निरीक्षण करण्याच्या सूचना देखील दिल्या आहेत. एजन्सीने चीनच्या लोकांना या आजारावर केलेल्या उपाययोजनांचे पालन करण्यास सांगितले आहे. सर्व लोकांना आवाहन करण्यात आले आहे की त्यांनी आजारी लोकांपासून अंतर राखावे, आजारी असल्यास घरीच राहावे आणि मास्क वापरावे’.