पुणे : “ भारताने गुलामगिरीचे एक चिन्ह आपल्या छातीवरून आजपासून उतरवून ठेवले आहे. भारतीय नौसेनेला नवा ध्वज मिळाला आहे. आत्तापर्यंत भारतीय नौसेनेच्या ब्रिटिश ध्वजावर गुलामगिरीचे चिन्ह होते. पण आजपासून छत्रपती शिवाजी महाराजांपासून प्रेरणा घेऊन नौदलाचा नवा ध्वज समुद्रात आणि आकाशात फडकेल. हा नवा ध्वज नौसेनेचे जनक छत्रपती शिवाजी महाराजांना समर्पित करतो. मला विश्वास आहे की, भारतीयत्वाच्या भावनेने भारलेला हा नवा ध्वज भारतीय नौदलाच्या आत्मसन्मान आणि आत्मसामर्थ्याला नवी ऊर्जा देईल. असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले.
The new Naval Ensign was unveiled by PM today, during the commissioning of #INSVikrant, the first indigenously built Indian Aircraft Carrier and thus, an apt day for heralding the change of ensign. INS Vikrant will adorn the new White ensign with effect from its commissioning. pic.twitter.com/OxEJ2mQXfo
— ANI (@ANI) September 2, 2022
कोच्चीमध्ये आज आयएनएस विक्रांतचे भारतीय नौदलात अनावरण पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते करण्यात आले. यावेळी बोलताना वरील प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले केले आहे. यावेळी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, राज्यपाल आरिफ मोहम्मद खान, मुख्यमंत्री पिनराई विजयन आणि इतर लष्करी अधिकारी उपस्थित होते.
यावेळी बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले कि, “भारतीय सामर्थ्याचं प्रतीक म्हणजे विक्रांत आहे. प्रत्येक भारतीयासाठी आयएनएस विक्रांत म्हणजे स्वाभिमान आहे”, अशा शब्दांत आयएनएस विक्रांतच्या सामर्थ्याचा गौरव केला आहे. तसेच ‘विक्रांत’ केवळ युद्धनौका नाहीय, तर भारताच्या कठोर परिश्रमाचा हा पुरावा आहे. असेही मोदींनी सांगितले आहे.
भारताला स्वातंत्र्य मिळाल्यापासून तब्बल चार वेळा भारतीय नौदलाचा ध्वज बदलण्यात आला. मात्र, प्रत्येकवेळी त्यामध्ये ब्रिटिश राजवटीचं एक प्रकारे प्रतीक असणाऱ्या दोन लाल रंगाच्या रेषा असायच्या. या रेषांना सेंट जॉर्ज क्रॉस असं म्हटलं जातं. पण आता भारतीय नौदलाला नवा ध्वज मिळाला असून त्यावरून सर्व प्रकारच्या ब्रिटिश खुणा काढून टाकण्यात आल्या आहेत.
Indigenous Aircraft Carrier IAC Vikrant, largest & most complex warship ever built in India’s maritime history, named after her illustrious predecessor, India’s first Aircraft Carrier which played a vital role in 1971 war, is all set to be commissioned.#INSVikrant
(Source:Navy) pic.twitter.com/K9EhN8QON4
— ANI (@ANI) September 2, 2022
दरम्यान, छत्रपती शिवरायांच्या राजमुद्रेचा आकार आणि त्याला असलेली दुहेरी किनार यावरून प्रेरणा घेऊन ध्वजासाठी ही नक्षी तयार करण्यात आली आहे. अशोकस्तंभाच्या खाली ‘सत्यमेव जयते’ असे निळ्या रंगात लिहिण्यात आले आहे. त्यासोबत नांगराच्या खाली ‘सम नो वरुनाह’ हे नौदलाचे ब्रीदवाक्य लिहिण्यात आले आहे.
नौदलाच्या नव्या ध्वजामध्ये डाव्या बाजूच्या वरच्या कोपऱ्यात भारताचा तिरंगा आहे. तर उजव्या बाजूला अष्टकोनी आकारामध्ये निळ्या पार्श्वभूमीवर सोनेरी रंगात अशोकस्तंभ आणि नौकांचा नांगर काढण्यात आला आहे. या अष्टकोनी आकाराला सोनेरी रंगात दुहेरी किनार काढण्यात आली आहे. सर्वात बाहेरची किनार ही जाड आणि त्याच्याआतील किनार ही काहीशी बारीक आहे.