नवी दिल्ली : गेल्यावर्षी चॅट जीपीटी लाँच झाले. याचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. जेव्हा हे लाँच झाले तेव्हा करोडो नोकऱ्या जाण्याची भीती निर्माण झाली होती. त्यात चॅटजीपीटीद्वारे अवघ्या जगाला धडकी भरविणाऱ्या कंपनीने सीईओ आणि सह संस्थापक सॅम ऑल्टमनला नोकरीवरून काढून टाकले आहे. आता भारतीय वंशाच्या मीरा मुरत्ती या अंतरिम सीईओ असतील असे सांगितले जात आहे.
ऑल्टमन बाहेर पडल्यानंतर सीटीओ मीरा मुरत्ती या अंतरिम सीईओची भूमिका स्वीकारणार आहेत. कंपनी कायमस्वरूपी सीईओसाठी शोध सुरू ठेवणार आहे. एवढेच नाही तर ओपन एआयचे अध्यक्ष ग्रेग ब्रॉकमन हे बोर्डाचे अध्यक्षपद सोडणार आहेत. ओपन एआयमध्ये जेवढा काळ काम केले मला आनंद मिळाला, असे ट्विट ऑल्टमनने केले आहे. कंपनीत प्रतिभावान लोकांसोबत काम करताना मला सर्वाधिक आनंद झाला आहे, असे ते म्हणाले.
कंपनीच्या बोडनि खूप विचारविनिमय केल्यानंतर ऑल्टमन यांना पदावरून हटवण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे बोर्डाला त्यांच्या जबाबदाऱ्या पार पाडण्यात अडथळा आला आहे. बोर्डाला आता ऑल्टमनच्या क्षमतेवर विश्वास राहिलेला नाही, त्यामुळे त्यांना आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागला आहे, असे ओपन एआयने जारी केलेल्या निवेदनात म्हटलंय.