Chandrayaan 3 : मुंबई : भारतीय अंतराळ संशोधन संस्थेच्या (इस्रो) इतिहासात १४ जुलै २०२३ हा महत्त्वाचा दिवस आहे. भारताची तिसरी चंद्र मोहीम चांद्रयान-३ ही १४ जुलै रोजी दुपारी २ वाजून ३५ मिनिटांनी आंध्र प्रदेशातील श्रीहरिकोटा येथील स्पेसपोर्टवरून प्रक्षेपित केली जाणार आहे. मंगळवारी प्रक्षेपणाची तालीम यशस्वी झाली. या मोहिमेचं वैशिष्ट्य म्हणजे पहिल्यांदाच चांद्रयान चंद्राच्या पृष्ठभागावर उतरणार आहे. चांद्रयान-३ च्या प्रक्षेपणाची उत्सुकता सर्वांनाच लागली आहे.
इस्रोच्या चंद्र मोहिमेतील तिसरं चंद्रयान
ही मोहीम २०१९ चांद्रयान-२ या मोहिमेचाच एक भाग आहे. लँडर आणि रोव्हर २०१९ मध्ये चंद्रावर सॉफ्ट-लँड करू शकले नाहीत, त्यामुळे ही मोहीम अयशस्वी ठरली होती. (Chandrayaan 3 ) चांद्रयान-३ ही भारताची तिसरी चांद्रमोहीम आहे. चांद्रयान-३ चे प्रक्षेपण शुक्रवारी दुपारी प्रस्तावित आहे. श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रात मोहिमेच्या तयारीचे विश्लेषण पूर्ण झाले आहे. इस्रोच्या बोर्डानेही प्रक्षेपणासाठी परवानगी दिली आहे.
चांद्रयान मोहिमेअंतर्गत २३ किंवा २४ ऑगस्ट रोजी विक्रम लँडर चंद्राच्या पृष्ठभागावर उतरवता येईल. या मोहिमेची रंगीत तालिम पूर्ण केल्यावर शास्त्रज्ञांची टीम चांद्रयान-३ चं छोटं मॉडेल घेऊन तिरुपती मंदिरात दर्शनासाठी गेली. ही मोहीम निर्विघ्न पार पडू दे, अशी प्रार्थना त्यांनी केली. सुमारे ३.८४ लाख किलोमीटर प्रवास केल्यानंतर, चांद्रयान-३ अंतराळयान २३ किंवा २४ ऑगस्ट रोजी चंद्राच्या पृष्ठभागावर उतरण्याची अपेक्षा आहे. चांद्रयान-३ अंतराळ यानामध्ये प्रोपल्शन मॉड्यूल (वजन २,१४८किलो), लँडर (१,७२३,८९ किलो) आणि रोव्हर (२६ किलो) यांचा समावेश आहे.
चांद्रयान-३ चा मुख्य उद्देश लँडरला चंद्रावर सुरक्षितपणे उतरवणे हा आहे. (Chandrayaan 3) त्यानंतर ते रोव्हर प्रयोग करण्यासाठी बाहेर पडेल. लँडरच्या इजेक्शननंतर प्रोपल्शन मॉड्यूलद्वारे वाहून नेलेल्या पेलोडचे आयुष्य तीन ते सहा महिन्यांच्या दरम्यान असते. दुसरीकडे, लँडर आणि रोव्हरचं मिशन लाइफ १ चंद्र दिवस किंवा १४ पृथ्वी दिवस आहे, असं इस्रोने म्हटलं आहे.
चांद्रयान ही भारताची महत्वाची चंद्र मोहिम आहे. याचं वैशिष्ट्य म्हणजे पहिल्यांदाच चांद्रयान चंद्राच्या पृष्ठभागावर उतरणार आहे. चांद्रयान- ३ इस्रोच्या चंद्र मोहिमेतील तिसरं चंद्रयान आहे. (Chandrayaan 3) याआधीच्या चांद्रयान १ आणि चांद्रयान २ प्रक्षेपित करण्यात आलं होतं. यांच्याद्वारे चंद्राच्या सभोवतालच्या वातावरणाचा अभ्यास करण्यात आला. पण आता चांद्रयान ३ चंद्रावरून उतरून तेथील वातावरण आणि परिस्थितीचा अभ्यास करेल.
चांद्रयान-३ LVM3 रॉकेटमध्ये बसवण्यात आलं आहे. चांद्रयान-३ प्रक्षेपणाची तयारी अंतिम टप्प्यात आहे. इस्रोकडून चांद्रयान ३ लाँच व्हेइकलसोबत म्हणजेच LVM3 रॉकेटसोबत जोडल्यानंतर पुढील चाचणी आणि तपासणी सुरु आहे. चांद्रयान-३ लाँच व्हेईकल मार्क-३ द्वारे आंध्र प्रदेशातील श्रीहरिकोटा येथील सतीश धवन स्पेस सेंटरमधून प्रक्षेपित करण्यात येईल. प्रॉपेलंट मॉड्यूल ‘लँडर’ आणि ‘रोव्हर’ला चंद्राभोवती १०० किलोमीटरच्या कक्षेत नेईल आणि चांद्रयान- ३ अलगदपणे चंद्राच्या पृष्ठभागावर उतरेल.
भारताच्या महत्त्वाकांक्षी चंद्र मोहिमेचा महत्त्वाचा भाग चांद्रयान-३ हा चांद्रयान १ आणि चांद्रयान २ चा पुढील टप्पा आहे. चांद्रयान-३ अगदी चांद्रयान-२ सारखंच असणार आहे. परंतु, यावेळी फक्त लँडर-रोवर आणि प्रोपल्शन मॉडेल असेल. यामध्ये ऑर्बिटर पाठवण्यात येणार नाही. चांद्रयान-२ च्या ऑर्बिटरकडून चांद्रयान ३ साठी मदत घेण्यात येणार आहे. चांद्रयान- ३ यूएन राव उपग्रह केंद्रातून प्रक्षेपित केलं जाणार आहे. चांद्रयान-३ चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरवण्याची योजना आहे. चांद्रयान ३ च्या साहाय्याने चंद्रावर वैज्ञानिक उपकरणं पाठवून त्याच्या पृष्ठभागाचा अभ्यास केला जाईल. भविष्यातील मानवी चंद्र मोहिमेच्या दृष्टीने ही मोहिम फार महत्त्वाची आहे.
चांद्रयान- ३ या मोहिमेसाठी लागणारे इंजिन मुंबईत बनवण्यात आलं आहे. विक्रोळी येथील गोदरेज कंपनीच्या कारखान्यात त्याची निर्मिती करण्यात आली आहे.(Chandrayaan 3) त्यामध्ये तीन प्रमुख आणि २५ लहान इंजिनचा समावेश आहे. ही मोहीम २०१९ चांद्रयान-२ मोहिमेचा एक भाग आहे. २०१९ मध्ये, लँडर आणि रोव्हर चंद्रावर सॉफ्ट-लँड करू शकले नाहीत, ज्यामुळे मोहीम अयशस्वी झाली होती.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Mumbai News : बाईकच्या आरशाला धक्का लागला अन् मोठा अनर्थ घडला; तरुणाची हत्या!
Mumbai News : समृद्धी महामार्गावर एअर अॅम्बुलन्स सुरू करणार; राज्य सरकारचा मोठा निर्णय!