गोंडा: उत्तर प्रदेशातील गोंडा जिल्ह्यात मोठा रेल्वे अपघात झाला आहे. दिब्रुगड एक्स्प्रेसचे सुमारे 12 डबे रुळावरून घसरले आहेत. ही एक्स्प्रेस ट्रेन चंदीगडहून दिब्रुगडला जात असताना हा अपघात झाला. गोंडा जिल्ह्यातील जिलाही आणि मोतीगंज रेल्वे स्थानकांदरम्यान हा अपघात झाला. सध्या मदत आणि बचावकार्य सुरू आहे. गोंडाचे आयुक्त शशिभूषण सुशील यांनी दिलेल्या माहितीनुसार, अपघातात एका प्रवाशाचा मृत्यू झाला आहे, तर दोन प्रवासी जखमी झाले आहेत. माहिती मिळताच अपघात सहाय्यता गाडीही घटनास्थळी रवाना करण्यात आली आहे. रेल्वेचे सर्व वरिष्ठ अधिकारीही घटनास्थळी पोहोचले आहेत.
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनीही गोंडा येथील दिब्रुगड रेल्वे अपघाताची दखल घेतली आहे. त्यांनी जिल्हा प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना घटनास्थळी पोहोचून मदतकार्य त्वरीत करण्याच्या सूचना दिल्या आहेत. सीएम योगी यांनी जिल्हा प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करून त्यांच्यावर योग्य उपचार करण्याच्या सूचना दिल्या आहेत. सध्या गोंडा जिल्हा प्रशासन आणि गोरखपूर रेल्वे विभागाचे अधिकारी घटनास्थळी पोहोचले आहेत.
आसाम सीएम ऑफिसने ट्विट केले आहे की, मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांना उत्तर प्रदेशातील दिब्रुगड-चंदीगड एक्स्प्रेस रुळावरून घसरल्याच्या घटनेची माहिती देण्यात आली आहे. ते परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत आणि आसाम सरकार संबंधित अधिकाऱ्यांच्या संपर्कात आहे.
केंद्रीय रेल मंत्री जी के जन्मदिन पर एक और रेल दुर्घटना।
उत्तर प्रदेश में गोंडा के पास डिब्रूगढ़ एक्सप्रेस/चंडीगढ़ एक्सप्रेस पटरी से उतर गई।
मंत्री जी रील ही बनायेंगे या रियल में कुछ करेंगे?#TrainAccident #Gonda pic.twitter.com/D5qo7Tk4t6— Chunnilal Choudhary (@c_l_bhadu) July 18, 2024
दिब्रुगड एक्स्प्रेसचा एसी डबा उलटला
घटनास्थळाचे फोटो-व्हिडिओही समोर आले आहेत, ज्यामध्ये एसी कोच उलटलेला दिसत आहे. अशा परिस्थितीत प्रवासी आत अडकले, तर जखमी आणि मृतांचा आकडा वाढू शकतो. सध्या स्थानिक नागरिकही घटनास्थळी पोहोचून जिल्हा प्रशासन आणि रेल्वे टीमला मदतकार्यात मदत करत आहेत. एसी डब्यांच्या खिडक्यांच्या काचा फोडून लोकांना बाहेर काढले जात आहे. प्रवाशांना ट्रेनमधून बाहेर काढून रुळांवर झोपवले जात असल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे.