पुणे प्राईम न्यूज : राजस्थानच्या जयपूरमधील सोडाला एलिव्हेटेड रोडवर शनिवारी दुपारी एक भीषण घटना घडली आहे. येथील रस्त्यावर चालत्या कारने अचानक पेट घेतला. इतकेच नाही तर पेटलेली कार रस्त्यावर सुसाट धावत सुटली. हा भीषण प्रकार पाहून रस्त्यावरील लोक देखील सैरावैरा धावताना व्हिडिओमध्ये दिसत आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
घटनेबाबत मिळालेल्या माहितीनुसार, जितेंद्र जांगीड अजमेर कल्व्हर्टवरून कार चालवत होते, पण कार चालवत असताना अचानक कारच्या एसीमधून धूर येऊ लागला. काही क्षणात आगीचा भडका उडाला आणि सर्वत्र धूर पसरू लागला. त्यानंतर जितेंद्र यांनी संपूर्ण प्रकरण लक्षात घेऊन कारचा हँडब्रेक ओढला आणि उडी मारली. यावेळी आजूबाजूच्या लोकांनी आग विझवण्याचा प्रयत्न केला, मात्र आग वेगाने पसरू लागली. वाढलेल्या आगीमुळे हॅंडब्रेक खेचूनही कार स्वत:हून रस्त्यावर धावत सुटली. त्यामुळे रस्त्यावर उपस्थित नागरिकांमध्ये मोठा गोंधळ उडाला.
अखेर एलिव्हेटेड रोडवर एका उतारावर गाडी थांबली. त्या रस्त्यावर उपस्थित असलेल्या नागरिकांनी या घटनेची माहिती अग्निशमन दलाला दिली. अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेऊन आगीवर नियंत्रण मिळवले.
A dramatic incident unfolded on Friday evening in Jaipur’s Sodala Sabzi Mandi area when a burning, driverless car ( MG Hector ) caused widespread panic. The car, driven by Jitendra, caught fire due to a suspected short circuit. Upon noticing the flames and smoke, Jitendra quickly… pic.twitter.com/F3jy92wekL
— Prateek Singh (@Prateek34381357) October 13, 2024