नवी दिल्ली: दिल्ली दारू घोटाळा प्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) तेलंगणाचे माजी मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांची कन्या के. कविता यांना ताब्यात घेतले आहे. त्यांना तेलंगणातून दिल्लीत आणले जात आहे. यापूर्वी कविता यांच्या निवासस्थानासह इतर ठिकाणी ईडीने मोठी कारवाई केली आहे. ईडीने कविता यांच्या हैदराबाद येथील निवासस्थानी आणि इतर ठिकाणी शोध मोहीम राबवली. दिल्ली सरकारच्या पूर्वीच्या उत्पादन शुल्क धोरणाशी संबंधित कथित हवाला व्यवहाराच्या प्रकरणात ही कारवाई करण्यात आली आहे.
तेलंगणाचे माजी मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांची कन्या के. कविता यांच्याविरुद्ध दिल्लीतील कथित दारू घोटाळ्यात एकूण दोन गुन्हे दाखल आहेत. भ्रष्टाचाराशी संबंधित प्रकरणाचा तपास सीबीआय करत आहे. त्याचवेळी, हवालाद्वारे पैशांच्या व्यवहाराच्या प्रकरणात अंमलबजावणी संचालनालय मनी लाँडरिंग कायद्यांतर्गत तपास पुढे नेत आहे.
BRS MLC K Kavitha is being brought to Delhi by ED: Sources
(file pic) pic.twitter.com/23NM1P7cEc
— ANI (@ANI) March 15, 2024
;