Brij Bhushan Sharan Singh : भारतीय कुस्तीगीर महासंघांचे माजी अध्यक्ष ब्रिजभूषण शरण सिंह यांच्या अडचणी वाढल्या आहेत. लैंगिक छळ केल्याप्रकरणी दिल्ली न्यायालयाकडून लैंगिक छळ, महिलांचे ब्लॅकमेलिंग अशा अनेक आरोपांची निश्चिती करण्यात आली आहे. ब्रिजभूषण सिंहांनी न्यायाधीश प्रियांका राजपूत यांच्यासमोर मी निर्दोष असल्याचे म्हटले आहे. न्यायालयातून बाहेर आल्यानंतर बृजभूषण सिंह यांनी पत्रकारांशी संवाद साधत अनेक प्रश्नांना उत्तर दिले.
यावेळी पत्रकारांनी बृजभूषण यांना असा प्रश्न विचारला कि, तुम्ही म्हणाला होतात की, आरोप निश्चित झाले तर, मी फासावर लटकेल, यावर उत्तर देताना ब्रिजभूषण शरण सिंह म्हणाले, रात्री या फासावर लटकतो. तुम्ही काहीही विनोद करत आहात. मी म्हटलो होतो आरोप सिद्ध झाले तर फासावर लटकेन. आता माझ्यावर आरोप निश्चित झाले आहेत. त्यांना न्यायालयात आरोप सिद्ध करायचे आहेत. माझ्याकडे मी निर्दोष असल्याचे पुरावे आहेत. न्यायालयाची एक प्रोसेस असते, त्याप्रमाणे आपण गेले पाहिजे, असे ब्रिजभूषण शरण सिंह यावेळी म्हणाले.
पुढे बोलताना म्हणाले, मी काहीच गुन्हा केलेला नाही, तर गुन्ह्यांची कबुली कशामुळे देऊ? असे ब्रिजभूषण सिंह म्हणाले आहेत. न्यायालयात सहआरोपी असलेल्या सचिन तोमर यांच्याविरोधातही धमकी दिल्याप्रकरणी आरोप निश्चिती करण्यात आली आहे. तोमर यांनीही मी निर्दोष असल्याचे म्हणत आरोप फेटाळले आहेत. मी कोणत्याही महिला कुस्तीपटूला घरी बोलावलेले नाही, असं सचिन तोमर यांनी यावेळी म्हटलं आहे.