मुंबई : ब्रिटनच्या पंतप्रधानपदी लिज ट्रस विराजमान झाल्या आहेत. भारतीय वंशाचे ऋषी सुनक आणि लिज ट्रस यांच्यात पंतप्रधानपदासाठी चुरशीची लढत झाली. या निवडणुकीत ट्रस यांना ८१,३२६ मिळाली तर सुनक यांना ६०,३९९ एवढी मते मिळाली आहेत. लिज ट्रस यांनी २० हजार मतांच्या फरकाने ऋषी सुनक यांचा पराभव केला आहे. आणि लिज ट्रस यांनी पंतप्रधानपदाची सूत्रे हाती घेतील.
ट्विट पाहण्यासाठी येथे क्लीक करा:
#WATCH | Liz Truss defeats rival Rishi Sunak to become the new Prime Minister of the United Kingdom pic.twitter.com/Xs4q2A2ldu
— ANI (@ANI) September 5, 2022
लिज ट्रस म्हणाल्या की, “कंझर्व्हेटिव्ह पक्षाच्या नेतेपदी निवड झाल्याचा मला अभिमान वाटतो. आपल्या महान देशाचे नेतृत्व करण्यासाठी आणि देशाची सेवा करण्यासाठी माझ्यावर विश्वास दाखवल्याबद्दल सर्वांचे धन्यवाद. देशातील विविध समस्या सोडवण्यासाठी मी धाडसी निर्णय घेईन. देशाची आर्थिक विकासाठी पुढील दोन वर्षात भरीव कामगिरी करू व कर कमी करण्यासोबतच अर्थव्यवस्था वाढण्यासाठी प्रयत्न करणार आहे. असे ट्रस यांनी सांगितले आहे.