पंजाब : पंजाबच्या सरहिंद रेल्वे स्टेशनजवळ हावडा मेलच्या जनरल कोचमध्ये स्फोट झाल्याची घटना घडली आहे. या घटनेमध्ये चार जण जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. शनिवारी रात्री १०.३० वाजता ट्रेनमध्ये स्फोट झाल्याची घटना घडली. फटाक्यांनी भरलेला प्लास्टिकच्या बादलीत स्फोट झाल्याची घटना घडली आहे. या घटनेत जखमी झालेल्या प्रवाशांना सिव्हिल रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. स्फोटानंतर अधिकाऱ्यांनी घटनास्थळावरून नमुने घेऊन फॉरेन्सिक लॅबला पाठवले असल्याची माहिती मिळत आहे.
स्फोटाने खळबळ….
शनिवारी रात्री हावडा मेल कोचमध्ये अचानक स्फोट झाला. या स्फोटानंतर ट्रेनमध्ये एकच खळबळ उडाली. रेल्वे पोलिसांनी सांगितलं की, ‘प्लास्टिकच्या बादलीत फटाक्यांचा स्फोट झाला आहे. या स्फोटात चार जण जखमी झाले. एका महिलेसहित चार प्रवासी जखमी झाले आहेत. जखमी प्रवाशांना सिव्हिल रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. जीआरपी डीएसपी जगमोहन सिंह यांच्या माहितीनुसार, अजय कुमार आणि त्यांची पत्नी संगिता कुमारी, आशुतोष पाल, सोनू कुमार यांच्या नावाचा समावेश आहे. पोलिस या प्रकरणाचा तपास करत आहेत.
रेल्वेच्या निर्देशाकडे प्रवाशांचे दुर्लक्ष..
फतेहगड सिव्हिल रुग्णालयातील डॉक्टरांचं म्हणणं आहे की, ‘सर्व जखमी प्रवासी धोक्यातून बाहेर आहेत. त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. रेल्वेने सूचना दिल्यानंतरही धोकादायक वस्तू घेऊन प्रवास करतात. रेल्वेने जारी केले निर्देश दिवाळीच्या औचित्यावर सुरक्षेचा विचार करून रेल्वेने काही वस्तू नेण्यास बंदी घातली आहे. फटाके,अॅसिड, चमडं, पॅकेजमधील तेल, ग्रीस सारख्या वस्तूंना ट्रेनमध्ये घेऊन जाण्यास बंदी आहे. या वस्तू घेऊन जाताना दिसल्यास कलम १६४ अंतर्गत प्रवाशांना १००० रुपये दंड किंवा तीन वर्षांपर्यंत तुरुंगवासाची शिक्षा देण्यात आली आहे.