नवी दिल्ली: भारतीय जनता पक्षात प्रवेश केल्यानंतर काही दिवसांनी काँग्रेसचे माजी प्रवक्ते गौरव वल्लभ यांनी रविवारी काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश यांच्यावर निशाणा साधला. गौरव वल्लभ म्हणाले की, ज्यांनी कधीही क्लास मॉनिटरची निवडणूकही लढवली नाही ते आता पक्ष हाताळत आहेत.
एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलताना गौरव वल्लभ यांनी सुरुवातीला जयराम रमेश यांचे नाव घेतले नाही, पण जेव्हा पत्रकाराने जयराम रमेश यांचे नाव घेतले तेव्हा ते त्याच व्यक्तीबद्दल बोलत असल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले.
गेल्या ३० वर्षांपासून काँग्रेसचा जाहीरनामा एकच व्यक्ती करत आहे
गौरव वल्लभ पुढे म्हणाले, “मी काँग्रेसमध्ये प्रवेश केला तेव्हा 42 खासदार होते. नवीन विचारांना चालना मिळेल, या विचाराने मी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता, परंतु असे काहीही झाले नाही. उदाहरणार्थ, गेल्या 30 वर्षांपासून काँग्रेसचा जाहीरनामा हाच आहे. एक व्यक्ती ते घडवत आहे, जर त्या व्यक्तीचे विचार ठाम असते तर आज पक्षाची ही अवस्था झाली नसती.