नवी दिल्ली: दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी उर्वरित 41 उमेदवारांच्या नावांना मंजुरी देण्यासाठी शुक्रवारी भाजप मुख्यालयात केंद्रीय निवडणूक समितीची बैठक पार पडली. या बैठकीनंतर दुसऱ्या दिवशी भाजपने त्यांच्या 29 उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली. दिल्लीत भाजपने करावल नगरमधून कपिल मिश्रा, मोती नगरमधून हरीश खुराना, कोंडलीमधून प्रियांका गौतम यांना उमेदवारी दिली आहे.
भाजपा की केन्द्रीय चुनाव समिति ने दिल्ली में होने वाले विधानसभा चुनाव 2025 के लिए निम्नलिखित नामों पर अपनी स्वीकृति प्रदान की है। pic.twitter.com/STdMQZZ2VM
— BJP (@BJP4India) January 11, 2025
भाजपने 4 जानेवारी रोजी पहिली यादी जाहीर केली होती, ज्यामध्ये पक्षाने 29 उमेदवारांची नावे जाहीर केली होती. आता दुसऱ्या यादीतही २९ नावांची घोषणा करण्यात आली आहे. यासह भाजपने 58 जागांवर आपले उमेदवार उभे केले आहेत. दिल्लीत एकाच टप्प्यात ५ फेब्रुवारी २०२५ रोजी मतदान होणार असून ८ फेब्रुवारीला मतमोजणी होऊन निकाल घोषित केले जातील. भाजपच्या पहिल्या यादीत चार विद्यमान आमदारांना तिकीट देण्यात आले आहे. नवी दिल्लीतून अरविंद केजरीवाल यांच्या विरोधात पक्षाने परवेश वर्मा यांना उमेदवारी दिली आहे. भाजपच्या पहिल्या यादीत दोन महिलांना तिकीट देण्यात आले.