Bihar Temple Stampede : आज श्रावण महिन्यातील दुसरा सोमवार त्यामुळे भक्तजण भगवान शिवमंदिराचे दर्शन घेण्यासाठी जातात. तर आजच्या दिवशी बिहारच्या जहानाबाद जिल्ह्यातील मखदुमपूर येथील बाबा सिद्धनाथ मंदिरात मोठी दुर्घटना घडली आहे. श्रावण सोमवार असल्य़ामुळे मंदिरात दर्शन घेण्यासाठी भक्तांची लांबच लांब रांगा लागल्या होत्या, त्यात अचानक रेलिंग तुटल्याने मंदिरात चेंगराचेंगरी झाली. या चेंगराचेंगरीत सातजणांचा मृत्यू झाला तर अनेक जखमी झालेली माहिती समोर येत आहे.
#WATCH | Bihar: Divakar Kumar Vishwakarma, SHO Jehanabad says, “DM and SP visited the spot and they are taking stock of the situation…A total of seven people have died…We are meeting and inquiring the family members (of the people dead and injured)…We are trying to identify… https://t.co/yw6e4wzRiY pic.twitter.com/lYzaoSzVPH
— ANI (@ANI) August 12, 2024
या घटनेत जखमी झालेल्यांना जहानाबाद हॉस्पिटल आणि मखदुमपूर रेफरल हॉस्पिटलमध्ये पाठवण्यात आले आहे. त्यापैकी सात जणांना डॉक्टरांनी मृत घोषित केलं आहे. मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मंदिराच्या परिसरात प्रशासनाचे पथक पोहोचले असून तेथे बचावकार्य सुरु आहे.
यावेळी जहानाबादचे एसएचओ दिवाकर कुमार विश्वकर्मा म्हणाले की, ही एक दु:खद घटना आहे. सर्व व्यवस्था कडेकोट होती, आम्ही घटनास्थळावरील परिस्थितीचा आढावा घेत आहोत. जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक परिस्थितीचे निरीक्ष करत आहेत. मृतांच्या शवाचे पोस्टमार्टमसाठी पाठवले आहे. सध्या घटनास्थळावरील परिस्थिती नियंत्रण असल्याचे सांगितलं जात आहे.