DA Hike Updates: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महागाई भत्त्याबाबत महत्त्वाची माहिती समोर आली आहे. DA वाढीकडे देशभरातील केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांचे लक्ष लागले आहे. AICPI-IW म्हणजेच अखिल भारतीय ग्राहक किंमत निर्देशांकाच्या आकडेवारीवर आधारित गणनेनुसार यावेळी महागाई भत्त्यात 4 टक्क्यांची वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मात्र, केंद्र सरकारने अद्याप यासंदर्भात कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही.

जर DA मध्ये 4 टक्क्यांची वाढ मंजूर झाली, तर सध्या 60 टक्के असलेला महागाई भत्ता 64 टक्क्यांवर पोहोचू शकतो. DA ची गणना कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनावर केली जात असल्याने बेसिक पगार जितका जास्त, तितकी भत्त्यातील वाढही अधिक असेल.

उदाहरणार्थ, एखाद्या कर्मचाऱ्याचे बेसिक वेतन 18,000 रुपये असल्यास सध्या 60 टक्के DA प्रमाणे त्याला 10,800 रुपये महागाई भत्ता मिळतो. हा दर 64 टक्के झाल्यास DA 11,520 रुपये होईल. म्हणजे दरमहा 720 रुपयांची वाढ होऊ शकते.

44,900 रुपये बेसिक पगार असलेल्या कर्मचाऱ्याला सध्या 60 टक्के DA नुसार 26,940 रुपये मिळतात. 64 टक्के दर लागू झाल्यास हा भत्ता 28,736 रुपये होऊ शकतो. त्यामुळे दरमहा 1,796 रुपयांची वाढ होईल.
त्याचप्रमाणे 56,100 रुपये बेसिक वेतन असलेल्या कर्मचाऱ्यांचा सध्याचा DA 33,660 रुपये आहे. 64 टक्के दर झाल्यास तो 35,904 रुपये होईल. म्हणजे दरमहा 2,244 रुपयांचा अतिरिक्त फायदा होऊ शकतो.
दरम्यान, केंद्रीय कर्मचारी संघटनांकडून DA आणि DR वाढीची अधिकृत घोषणा लवकर करण्याची मागणी होत आहे. मात्र, प्रत्यक्ष वाढ किती असेल आणि ती कधीपासून लागू होईल, याचे अंतिम चित्र केंद्र सरकारच्या अधिकृत निर्णयानंतरच स्पष्ट होणार आहे.






