नवी दिल्ली : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्याबाबत मोठी बातमी समोर आली आहे. अरविंद केजरीवाल यांनी आपण मुंख्यमंत्रीपदाचा राजीनामा देणार असल्याची घोषणा केली आहे. दिल्ली मद्य धोरण प्रकरणी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना नुकताच जामीन मिळाला आहे. परंतु, सर्वोच्च न्यायालयाने सीबीआयच्या अटकेला नियमानुसार असल्याचे म्हटले आहे.
सीबीआयने त्यांना 26 जून रोजी कथित मद्य धोरण प्रकरणाशी संबंधित भ्रष्टाचार प्रकरणात अटक केली होती. न्यायालयाने जामीन देण्यासाठी अटी घातल्या आहेत. अरविंद केजरीवाल यांनी आपण दोन दिवसानंतर मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देणार असल्याचे जाहीर केले आहे. त्यामुळे दिल्लीच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे.