गुजरात: गुजरात मधील बनासकांठा येथे फटाका फॅक्ट्रीत स्फोट झाल्याने भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. आज (1 मार्च ) सकाळच्या सुमाराला ही घटना घडल्याची माहिती समोर आली आहे. लागलेल्या भीषण आगीत 17 जणांचा मृत्यू झाला आहे. कारखान्यात बॉयलरचा स्फोट झाल्याची प्राथमिक माहिती आहे. दुर्घटनेनंतर बचाव कार्य सुरू आहे. मृतांची संख्या वाढण्याचीही शक्यता आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, कारखान्यात लागलेल्या आगीत अनेक कर्मचारी अडकल्याची भीती आहे. या घटनेत पाच जणांचा जागीच मृत्यू झाल्याची माहिती जिल्हाधिकारी मिहिर पटेल यांनी दिली आहे. तसेच या ठिकाणी बचावकार्य सुरु करण्यात आले आहे असेही त्यांनी सांगितले.
दरम्यान, या घटनेचा एक व्हिडिओही समोर आला आहे. यामध्ये कारखान्याच्या आतील भिंतींना नुकसान झाल्याचे दिसत आहे. तसेच तेथील टिनचे शेड विखुरलेले दिसत आहे. धुराचे लोट दिसत आहेत. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.