देशातील सर्वोच्च नागरी पुरस्कार म्हणून भारतरत्न पुरस्कारांना संबोधले जाते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतरत्न पुरस्कारासंदर्भात महत्वाची घोषणा केली आहे. माजी पंतप्रधान चौधरी चरण सिंह यांच्यासोबतच नरसिंह राव, एन.एस स्वामीनाथन यांनाही भारतरत्न पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. पंतप्रधान मोदींनी ट्विट करत ही माहिती दिली.
भारत सरकार डॉ. एमएस स्वामीनाथन यांनी आपल्या देशाच्या कृषी आणि शेतकरी कल्याणात अतुलनीय योगदान दिले आहे. याची दखल घेऊन त्यांना भारतरत्न प्रदान करणे ही अत्यंत आनंदाची बाब असल्याचे पंतप्रधान म्हणाले. स्वामीनाथन यांनी आव्हानात्मक काळात भारताला कृषी क्षेत्रात स्वावलंबी होण्यासाठी मदत करण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. भारतीय शेतीच्या आधुनिकीकरणासाठी उत्कृष्ट प्रयत्न केले.
एक नवोदित, मार्गदर्शक, अनेक विद्यार्थ्यांमध्ये शिक्षण आणि संशोधनाला प्रोत्साहन देणारे त्यांचे अमूल्य कार्य देशाने पाहिले आहे. डॉ. स्वामीनाथन यांच्या दूरदर्शी नेतृत्वाने भारतीय शेतीचाच कायापालट झालाच. यासोबत देशाची अन्न सुरक्षा आणि समृद्धीही झाली. ते मला जवळून ओळखत असत आणि मी नेहमी त्याच्या अंतर्दृष्टीचा आदर केलाय, असेही पंतप्रधान यावेळी म्हणाले.
देशाचे माजी पंतप्रधान चौधरी चरण सिंह यांना भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करणे हे आमचे सौभाग्य असल्याची प्रतिक्रिया पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली आहे.
त्यांनी देशासाठी दिलेल्या अतुलनीय योगदानासाठी हा सन्मान आहे. त्यांनी शेतकऱ्यांचे अधिकार आणि कल्याणासाठी आपले जीवन समर्पित केले. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री राहिलेल्या चौधरी चरण सिंह यांनी गृहमंत्री म्हणून राष्ट्र निर्माणाला गती मिळवून दिली. आणीबाणीच्याविरोधात ते खंबीरपणे उभे राहिले. आमच्या शेतकरी बांधवांसाठी त्यांचे समर्पण, आणिबाणीवेळी लोकशाहीसाठी त्यांची प्रतिबद्धता देशाला प्रेरणा देणारी असल्याची प्रतिक्रिया पंतप्रधानांनी यावेळी दिली.