Rahul Gandhi Bharat Nyay Yatra : काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेला मिळालेल्या जनतेच्या पाठिंब्यानंतर आता राहुल गांधी भारत न्याय यात्रा काढण्याच्या तयारीत आहेत . मणिपूर ते मुंबई अशी ही भारत न्याय यात्रा निघणार असून लवकरच काँग्रेस भारत न्याय यात्रेला सुरुवात करणार आहे.
मिळालेल्या अधिक माहितीनुसार, पार्टी हायकमांड व्यतिरिक्त सर्व राज्यातील काँग्रेस नेते देखील या काँग्रेसच्या भारत न्याय यात्रा कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. नवीन वर्षात 14 जानेवारीपासून ईशान्य भारतातील मणिपूर राज्यातून ही यात्रा सुरु होणार असून महिनाभारानंतर म्हणजे 20 मार्चला मुंबईत दाखल होणार आहे. या प्रवासात काँग्रेसचे नेते 6200 किलोमीटरचं अंतर पार करण्याच्या तयारीत आहे.
१४ राज्यांमधील तब्बल ८५ जिल्ह्यांचा समावेश
राहुल गांधी यांच्या भारत न्याय यात्रेत १४ राज्यांमधील तब्बल ८५ जिल्ह्यांचा समावेश असणार आहे. हा मोर्चा मणिपूर, नागालँड, आसाम, मेघालय, पश्चिम बंगाल, बिहार, झारखंड, ओडिशा, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, छत्तीसगड, राजस्थान, गुजरात आणि महाराष्ट्रात असा ६ हजार २०० किलोमीटरचा प्रवास करेल.
काँग्रेसचे प्रमुख मल्लिकार्जुन खर्गे १४ जानेवारीला मणिपूरमधून या यात्रेला सुरुवात करतील. दरम्यान भारत जोडो यात्रेने ४ हजार ५०० किलोमीटर प्रवास केला होता. काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे 14 जानेवारी रोजी मणिपूरमध्ये भारत न्याय यात्रेला हिरवा झेंडा दाखवून हा प्रवास अधिकृतपणे सुरू होईल. ही यात्रा 20 मार्चला मुंबईत संपणार आहे.
#WATCH | Congress General Secretary KC Venugopal says, “AICC has decided to hold a Bharat Nyay Yatra from January 14th to March 20th from Manipur to Mumbai…” https://t.co/1jz7JjCqIF pic.twitter.com/YAndjhdf7i
— ANI (@ANI) December 27, 2023