Heavy Metals in Toothpaste: लोकप्रिय टूथपेस्ट ब्रँडमध्ये शिसे आणि आर्सेनिकसह विषारी धातूंचे धोकादायक प्रमाण आढळून आले आहे. लीड सेफ मामाने केलेल्या तपासणीत असे आढळून आले की, चाचणी केलेल्या ५१ टूथपेस्ट ब्रँडपैकी ९०% मध्ये शिसे होते, तर ६५% मध्ये आर्सेनिक होते. विविध टूथपेस्ट ब्रँडमध्ये शिसे, आर्सेनिक, पारा आणि कॅडमियम आढळून आले. मुलांसाठी विक्री केलेल्या काही टूथपेस्टमध्ये देखील हे विषारी धातू असतात. या धातूंच्या संपर्कात आल्याने गंभीर आरोग्य समस्या उद्भवू शकतात, विशेषतः लहान मूल आणि वृद्धांना या विषारी धातूचा धोका अधिक असतो. लीड सेफ मामाचे संस्थापक रुबिन यांनी याला धक्कादायक म्हटले होते. ते म्हणतात कि, “आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे कोणीही हा धोका गांभीर्याने घेत नाही.”
टूथपेस्टमध्ये विषारी धातू आढळलेल्या काही प्रमुख ब्रँड:
– क्रेस्ट
– सेन्सोडाइन
– टॉम्स ऑफ मेन
– डॉ. ब्रोनर्स
– कोलगेट
– डॉ. ब्राइट
तज्ञांनी असा इशारा दिला आहे की, शिशाचे प्रमाण कमी प्रमाणात देखील आरोग्यासाठी हानिकारक असू शकते, विशेषतः सहा वर्षांखालील मुलांसाठी हे विषारी धातू अधिक विषारी असू शकतात. टूथपेस्टमध्ये या विषारी धातूंची उपस्थिती या उत्पादनांच्या सुरक्षिततेबद्दल चिंता निर्माण करते. ग्राहकांना त्यांच्या टूथपेस्टमधील घटकांबद्दल जागरूक राहण्याचा आणि सुरक्षिततेच्या मानकांची पूर्तता करणारी उत्पादने निवडण्याचा सल्ला देण्यात येत आहे. टूथपेस्ट उद्योगात कठोर नियम आणि अधिक पारदर्शक लेबलिंगची आवश्यकता या अहवालातून अधोरेखित करण्यात आली आहे.