Wednesday, April 8, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

बांगलादेश पेटला..! ‘या’ नेत्याच्या हत्येनंतर राजधानी ढाकासह अनेक शहरांमध्ये हिंसक निदर्शने; संतप्त जमावाकडून प्रसारमाध्यमांचे कार्यालये लक्ष्य

Santosh Mundeby Santosh Munde
Friday, 19 December 2025, 14:24

ढाका: बांगलादेशातून मोठी बातमी समोर आलोई आहे. येथे आगामी सार्वत्रिक निवडणुकांची घोषणा झाल्यानंतर देशातील वातावरणात  तणाव निर्माण झाला आहे. येथील तरुण नेते आणि निवडणूक उमेदवार शरीफ उस्मान हादी यांच्या मृत्यूनंतर राजधानी ढाकासह अनेक शहरांमध्ये हिंसक निदर्शने (Bangladesh Violence) उसळली असून, परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेल्याचे चित्र दिसून येत आहे.

 

संतप्त जमावाकडून प्रसारमाध्यमांचे कार्यालय लक्ष्य

राजधानी ढाकामध्ये संतप्त जमावाने देशातील प्रमुख प्रसारमाध्यमांच्या कार्यालयांना लक्ष्य केले. रस्त्यांवर मोठ्या प्रमाणावर तोडफोड आणि जाळपोळ करण्यात आली. आंदोलकांनी देशातील आघाडीची वृत्तपत्रे ‘डेली स्टार’ आणि ‘प्रोथोम आलो’ यांच्या कार्यालयांवर हल्ले करत आत प्रवेश केला आणि मालमत्तेचे नुकसान केले. आगीच्या घटनेदरम्यान सुमारे 25 ते 30 पत्रकार इमारतीत अडकले होते, त्यांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले आहे.

शरीफ उस्मान हादी यांची गोळी झाडून हत्या

शरीफ उस्मान हादी हे ‘इन्कलाब मंच’ या संघटनेचे प्रवक्ते होते आणि ते आगामी सार्वत्रिक निवडणूक लढवण्याची तयारी करत होते. शुक्रवारी ढाकामध्ये प्रचार सुरू असताना मुखवटा घातलेल्या हल्लेखोरांनी त्यांच्या डोक्यात गोळी झाडली. गंभीर जखमी अवस्थेत त्यांना स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले, त्यानंतर पुढील उपचारांसाठी सिंगापूरला हलवण्यात आले. सहा दिवस लाइफ सपोर्टवर उपचार सुरू असताना गुरुवारी रात्री उशिरा त्यांचे निधन झाले.

ढाकासह अनेक शहरांमध्ये संतापाची लाट

हादी यांच्या मृत्यूची बातमी पसरताच ढाकासह अनेक शहरांमध्ये संतापाची लाट उसळली. आंदोलकांनी हादी यांच्या नावाने घोषणाबाजी करत त्यांच्या हत्येस जबाबदार असलेल्यांवर कठोर कारवाईची मागणी केली. रात्री उशिरापर्यंत अनेक भागांत तणाव कायम होता. परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी अतिरिक्त पोलीस आणि निमलष्करी दल तैनात करण्यात आले आहे. मात्र, हिंसाचाराबाबत पोलिसांकडून तत्काळ कोणतेही अधिकृत निवेदन जारी करण्यात आलेले नाही.

येत्या 12 फेब्रुवारी रोजी सार्वत्रिक निवडणुका होणार

सध्या बांगलादेशात अंतरिम सरकार कार्यरत आहे. ऑगस्ट 2024 मध्ये विद्यार्थ्यांच्या आंदोलनानंतर तत्कालीन पंतप्रधान शेख हसीना देश सोडून भारतात आल्या होत्या. त्यानंतर नोबेल पारितोषिक विजेते मुहम्मद युनूस यांच्या नेतृत्वाखाली अंतरिम सरकारची स्थापना करण्यात आले. देशात येत्या 12 फेब्रुवारी रोजी सार्वत्रिक निवडणुका होणार आहेत.

दरम्यान, राष्ट्राला संबोधित करताना मुहम्मद युनूस यांनी हादी यांच्या मृत्यूला बांगलादेशच्या राजकारणासाठी आणि लोकशाहीसाठी कधीही न भरून येणारे नुकसान असल्याचे म्हटले. त्यांनी नागरिकांना शांतता राखण्याचे आवाहन केले असून, या प्रकरणाची पारदर्शकपणे चौकशी केली जाईल, असे आश्वासन दिले आहे.

Santosh Munde

Santosh Munde

संतोष मुंडे यांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातून (रानडे इन्स्टिट्यूट) पत्रकारितेचे शिक्षण घेतले आहे. पुण्यातील नामवंत कोचिंग क्लासेससाठी स्क्रिप्ट रायटर आणि अँकर तसेच 'सोशल मीडिया मॅनेजर' म्हणून दोन वर्ष कार्यरत. वेब डेव्हलपमेंट आणि SEO एक्स्पर्ट. जानेवारी 2025 पासून 'पुणे प्राईम न्यूज' मध्ये उपसंपादक म्हणून कार्यरत.

ताज्या बातम्या

युद्धविरामाचा 24 तासांतच फज्जा! इस्रायलचा लेबनॉनवर भीषण हवाई हल्ला; 50 फायटर जेट्स, 160 बॉम्ब अन् 100 हून अधिक ठार

Wednesday, 8 April 2026, 23:14

शिरूरमध्ये एटीएसचा छापा! एमडी ड्रग्जसह 2 जण ताब्यात, 1 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त

Wednesday, 8 April 2026, 22:58

पुण्यात मामानेच केला अल्पवयीन भाचीवर अत्याचार; नराधमाला पुणे न्यायालयाचा दणका, २५ वर्ष सक्तमजुरी अन् १ लाख रुपये दंडाची शिक्षा

Wednesday, 8 April 2026, 22:35

‘घरगुती गॅससाठी सरकारचा मोठा निर्णय! औद्योगिक गॅस पुरवठ्यात 30% कपात; 56 हजार सिलिंडर जप्त, काळाबाजार रोखण्यासाठी “स्ट्राइक”

Wednesday, 8 April 2026, 21:17
viral news

viral news : “देव तारी त्याला कोण मारी” वृद्ध आजोबा दोरी तुटल्याने विहिरीत पडले; जगण्यासाठी ३ दिवस धडपड अन् एका OTP ने वाचवला जीव

Wednesday, 8 April 2026, 21:13

नाशिक महिला अत्याचार प्रकरणाचं पुणे कनेक्शन! महिलांना विकायचा प्लॅन आखला होता? पडळकरांचा खळबळजनक आरोप

Wednesday, 8 April 2026, 20:56
Next Post
Santosh Deshmukh Murder: 'High voltage' drama in court during Santosh Deshmukh's hearing! Sudarshan Ghule fainted as soon as the 'that' video was played; The accused were shocked, what exactly happened?

Santosh Deshmukh Murder: संतोष देशमुखांच्या सुनावणीत कोर्टात 'हाय व्होल्टेज' ड्रामा! 'तो' व्हिडीओ लावताच सुदर्शन घुले चक्कर येऊन पडला; आरोपींचे धाबे दणाणले, नेमकं काय घडलं?

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.