बंगळुरू : बंगळुरूमधील महालक्ष्मी प्रकरणाबाबत नवीन खुलासे आता समोर येत आहेत. 3 आणि 4 सप्टेंबरच्या रात्री महालक्ष्मीची हत्या करण्यात आली होती, त्यावेळी महालक्ष्मीच्या शरीराचे 59 तुकडे केले गेले होते. आरोपी आणि महालक्ष्मीमध्ये नेमके कशावरून वाद झाले होते? आरोपीला महालक्ष्मीची हत्या करुन मृतदेहाची विल्हेवाट लावण्याची कल्पना कुठून मिळाली?याबाबत आता धक्कादायक खुलासे समोर आले आहेत. महालक्ष्मीची हत्या झाली त्या रात्री काय घडलं? याबाबत आता मोठी माहिती समोर आली आहे.
मुक्तिरंजय रॉय महालक्ष्मीच्या प्रेमात वेडा..
महालक्ष्मीला अनेक मित्र होते. मुक्तिरंजन रॉय तिच्यावर खूप प्रेम करत होता. महालक्ष्मी त्याची जिद्द, हट्ट आणि प्रेम सर्वस्व असल्यासारखं तो वागत असे. महालक्ष्मीसोबत तो पूर्ण कमिटेड होता. मात्र त्यांच्या लव्हस्टोरीमध्ये एक ट्विस्ट आला आणि जे नको व्हायला ते होऊन बसलं. मुक्तिरंजन रॉयने महालक्ष्मीचा मोबाईल फोन चेक केला असता त्यात त्याला जे दिसलं त्यानंतर त्याच्या संतापाचा पारा चढला.
महालक्ष्मीच्या मोबाईलमध्ये अनेक मित्रांचे फोटो..
महालक्ष्मीच्या मोबाईलमध्ये तिच्यासोबत अनेक मित्रांचे फोटो होते. महालक्ष्मीचे मित्र आणि फोटो पाहून मुक्तिचा राग टोकाला गेला. याबाबत त्याने महालक्ष्मीसोबत बोलण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यातून दोघांमध्ये वाद निर्माण होऊ लागले. त्यांच्या नात्यात दुरावा येऊ लागला. मुक्ती रंजनला महालक्ष्मीशी लग्न करायचं होते. त्यासाठी तो तिला समजावण्याचा प्रयत्न करत होता. महालक्ष्मी लग्नाचा विषय टाळण्याचा प्रयत्न करत असे. त्यामुळे मुक्तीच्या डोक्यातला संशय बळावू लागला.
खुनाच्या रात्री जोरदार भांडण..
3 सप्टेंबरला म्हणजे खुनाच्या रात्री फोनमधील फोटो आणि अशा काही कारणांवरून दोघांमध्ये टोकाचे भांडण झाले. मुक्ती रंजन महालक्ष्मीच्या घरी तिला लग्नासाठी समजवण्याचा प्रयत्न करत होता, पण महालक्ष्मी त्याला नकार देत होती. मुक्ती लक्ष्मीवर आपला पगारातले अर्धे पैसे खर्च करत होता. ती आधीपासून लग्न झाल्याचं माहिती असतानाही त्याने हे सगळं केलं.
महालक्ष्मीचे आधीच लग्न झाले होते..
महालक्ष्मीचे आधीच लग्न झालेले होते, तिच्या पतीने तिच्या विरोधात पोलिस ठाण्यात तक्रारही दाखल केली होती. महालक्ष्मीच्या आयुष्यात आल्यानंतर मुक्ती रंजनलाही तिच्या लग्नाबद्दल माहिती होती. तो तिला लग्नासाठी सतत मनवत होता. मात्र ती नकार देत राहिली. त्याच वेळी मुक्ती रंजनला समजले की कदाचित तिच्या वेगवेगळ्या लोकांशी असलेल्या अफेअरमुळे ती आपल्याला नकार देत आहे. यामुळे त्याचा राग अधिक वाढत गेला आणि मनामध्ये सूडाची भावना निर्माण झाली. या गोष्टी हाताबाहेर जाऊ लागल्या तेव्हा मुक्तीरंजनने रागाच्या भरात महालक्ष्मीची हत्या केल्याची माहिती समोर आली.