मुंबई : अयोध्या नगरीत प्रभू श्री रामांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा उद्या २२ जानेवारीला होणार आहे. त्याची जय्यत तयारी महिनाभरापासून अयोध्येत पहायला मिळत आहे. त्यासंबंधीत मोठी बातमी समोर येत आहे. रामलल्लांची मूर्ती साकारणारे शिल्पकार अरुण योगीराज यांच्या अभूतपीर्व कार्याची दखल वर्ल्ड रेकॉर्ड्स बुक ऑफ इंडियामध्ये घेण्यात आली आहे.
अरुण योगीराज यांनी राम मंदिराच्या गर्भगृहासाठी साकारलेली श्री रामांची मूर्ती अंतिम झाल्याची नुकतीच घोषणा करण्यात आली होती. प्राणप्रतिष्ठा केली जाणारी मूर्ती ५१ इंची असून यामध्ये श्री रामाचे पाच वर्षाचे रूप दिसणार आहे.
अरुण योगीराज हे मूळचे कर्नाटकातील मैसूर येथील आहे. आतापर्यंत अनेक आकर्षक मूर्त्या त्यांनी साकारल्या आहेत. त्यांनी साकारलेली श्री रामांची मूर्ती विधी सोहळ्यांमध्ये सर्वांसमोर येणार आहे. त्यांच्या या कौतुकास्पद कामगिरीबद्दल त्यांना प्रमाणपत्र देण्यात आलेले आहे.
वर्ल्ड रेकॉर्ड्स बुक ऑफ इंडियाच्या सुषमा नार्वेकर यांनी अरुण योगीराज यांच्या पत्नी विजेता योगीराज यांच्याशी संवाद साधला. आपल्यासाठी हा सर्वात उत्तम सन्मान आहे असे त्यांनी म्हटले आहे.