Israel and Hamas war : नवी दिल्ली : इस्रायल- हमास युद्धात हजारो पॅलेस्टिनी नागरिकांच्या मृत्यू झाला.आतायुद्धाला कंटाळून इस्रायलला दोष देणाऱ्या अरब नेत्यांनी शनिवारी तत्काळ युद्धविरामाची मागणी केली. मात्र, अशी कृती अंगावर उलटणारी ठरू शकते आणि त्यामुळे हमास या दहशतवादी गटाला अधिक हिंसाचारासाठी प्रोत्साहन मिळू शकते. त्यामुळे सर्व देश घाबरले आहेत.
अरब देशाचे परराष्ट्रमंत्री ब्लिंकन यांनी शनिवारी दुपारी इजिप्त, जॉर्डन, सौदी, कतार व संयुक्त अरब अमिरातीचे राजदूत आणि एक वरिष्ठ पॅलेस्टिनी अधिकारी यांच्याशी चर्चा केली. त्यात, गाझामधील नागरिकांचे संरक्षण करणे आणि वेढल्या गेलेल्या गाझामध्ये जादा प्रमाणात मदत पाठवणे या विषयांवर जॉर्डन व इजिप्त देशांच्या आपल्या चर्चा केली. युद्धात इस्रायलला पाठिंबा दर्शवण्यासाठी ब्रिटनचे माजी पंतप्रधान बोरिस जॉन्सन व ऑस्ट्रेलियाचे माजी पंतप्रधान स्कॉट मॉरिसन हे तेल अवीवमध्ये आल्याचे वृत्त ‘दि टाइम्स ऑफ इस्रायल’ने दिले आहे. या भेटीत जॉन्सन व मॉरिसन हे इस्रायलचे अध्यक्ष इसाक हेझरेग यांना, तसेच दहशतवाद्यांनी गाझामध्ये ओलीस ठेवलेल्या लोकांच्या कुटुंबीयांना भेटणार आहेत.
‘गाझावर अणुबॉम्ब टाकणे हा एक पर्याय आहे, असे वक्तव्य इस्रायलमधील अति-उजव्या ओझमा येहुदि पक्षाच्या एका मंत्र्याने केल्यानंतर पंतप्रधान बिन्यामिन नेतान्याहू यांनी सरकारच्या बैठकांमधून त्यांना अनिश्चित काळासाठी निलंबित केले.गाझामध्ये न लढणारे कुणीही नाही आणि त्या भागात मानवीय आधारावर मदत पुरवणे हे अपयश ठरेल असे जेरुसलेम व्यवहार व वारसा मंत्री अमिहाई एलियाहू यांनी म्हटले होते.