नवी दिल्ली : आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन. चंद्राबाबू नायडू यांनी तिरुमला तिरुपती देवस्थानाच्या प्रसादाबद्दल माजी मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांच्या सरकारवर गंभीर आरोप केला आहे. नायडूंनी केलेल्या धक्कादायक दाव्यानुसार, तिरुपती येथील श्री वेंकटेश्वर मंदिरात तयार होणा-या प्रसाद लाडूमध्ये तुपाऐवजी जनावरांची चरबी वापरण्यात आल्याचा आरोप केला आहे. नायडूंनी हा आरोप बुधवारी एनडीएच्या विधीमंडळ पक्षाच्या बैठकीत केला आहे.
तिरुपती बालाजीच्या प्रसादाच्या लाडूंवरुन मुख्यमंत्री चंद्राबाबू यांनी गंभीर आरोप केला आहे. पवित्र लाडवात शुद्ध तुपाऐवजी जनावरांच्या चरबीचा वापर करण्यात आला आहे. वायएसआर काँग्रेसवर निशाणा साधण्यात आला आहे. शुद्ध तुपाऐवजी त्यांनी प्राण्यांची चरबी वापरली. मात्र, आता शुद्ध तुपाचा वापर केला जात असल्याचंही चंद्राबाबूंनी स्पष्ट केलं आहे. मंदिरातील सर्व काही स्वच्छ करण्यात आलं आहे. यामुळे गुणवत्ता सुधारली आहे, असं देखील चंद्राबाबूंनी स्पष्ट केलं.
चंद्राबाबू नायडू म्हणाले, गेल्या 5 वर्षांत, आयएसआर काँग्रेस पक्षाच्या नेत्यांनी तिरुमलाचे पावित्र्य कलंकित केले आहे. त्यांनी ‘अन्नदानम’ (मोफत अन्न) च्या गुणवत्तेशी तडजोड केली असून प्रसादाच्या लाडूत तुपाऐवजी प्राण्यांची चरबी वापरून पवित्र तिरुमलाचे पावित्र्य भंग केले. या प्रकरणामुळे चिंता वाढली आहे. तथापि, आमचे सरकार येथील शुद्धतेचे रक्षण करण्याचा प्रयत्न करीत असल्याचं चंद्राबाबू नायडू यांनी म्हटलं आहे.
वायएसआर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि राज्यसभा खासदार वायव्ही सुब्बा रेड्डी यांनी नायडूंवर तिरुमला मंदिराच्या पावित्र्याला हानी पोहोचवल्याचा आरोप केला. रेड्डी यांनी तेलुगू ऑन एक्समध्ये लिहिलं की, चंद्राबाबू नायडू यांनी तिरुमलाच्या पावित्र्याला आणि कोट्यवधी हिंदूंच्या श्रद्धेला गंभीर हानी पोहोचवली आहे. तिरुमला प्रसाद यांच्याबद्दल त्यांनी केलेल्या टिप्पण्या अत्यंत दुर्दैवी आहेत. कोणीही असे शब्द बोलू नये किंवा आरोप करू नये.
दरम्यान, आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन. चंद्राबाबू नायडूंच्या दाव्यामुळे आंध्र प्रदेशात मोठा वाद निर्माण झाला आहे.
Animals fat was used instead of ghee in Tirupati Laddu Prasadam – AP CM Chandrababu Naidu pic.twitter.com/C4V7pzIN1e
— Aryan (@chinchat09) September 19, 2024