नवी दिल्ली : खासदार अमोल कोल्हे यांना पक्षाने मोठी जबाबदारी दिली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचा उपनेता, मुख्य प्रतोद म्हणून अमोल कोल्हे यांची निवड करण्यात आली आहे. याबाबतची पोस्ट अमोल कोल्हे यांनी सोशल मीडियावर शेअर केली आहे. एक सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील मुलगा कधीतरी लोकसभेत पक्षाचा उपनेता, मुख्य प्रतोद होऊ शकतो अशी कल्पनाही कोणी केली नसेल असं म्हणत अमोल कोल्हे यांनी नवी जबाबदारी मिळाल्याबाबत आनंद व्यक्त केला आहे.
काय म्हणाले अमोल कोल्हे ?
एक सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील मुलगा कधीतरी लोकसभेत पक्षाचा उपनेता, मुख्य प्रतोद होऊ शकतो अशी कल्पनाही कोणी केली नसेल, परंतु आदरणीय पवार साहेब आणि आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या सर्वसमावेशक धोरणामुळे हे शक्य झाले आहे. ही मोठी जबाबदारी आहे याची मला जाणीव आहे. ही जबाबदारी पेलण्याचं बळ माझ्या शिरुर लोकसभा मतदारसंघातील जनतेचे आशीर्वाद आणि शुभेच्छांमुळे मिळतेय ही माझ्यासाठी मोलाची बाब आहे.
एक सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील मुलगा कधीतरी लोकसभेत पक्षाचा उपनेता, मुख्य प्रतोद होऊ शकतो अशी कल्पनाही कोणी केली नसेल, परंतु आदरणीय पवार साहेब आणि आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या सर्वसमावेशक धोरणामुळे हे शक्य झाले.
ही मोठी जबाबदारी आहे याची मला जाणीव… pic.twitter.com/cEnOj0ngEa— Dr.Amol Kolhe (@kolhe_amol) July 3, 2024
लोकशाहीच्या सर्वोच्च मंदिरात माझ्या नावाची पाटी लागली. हा माझ्यासह शिरूर लोकसभा मतदारसंघातील मायबाप जनतेचा, महाराष्ट्रातील तमाम शेतकरी कामगार कष्टकरी जनतेचा सन्मान आहे. माझ्यावर हा विश्वास दर्शवल्याबद्दल आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब, खा. सौ. सुप्रियाताई सुळे आणि माझे संसदेतील सर्व सहकारी यांचे मनापासून आभार…! असं अमोल कोल्हे म्हणाले आहेत.